शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनाला जाणाऱ्या महिलांना संरक्षण द्यावे

By admin | Updated: April 2, 2016 23:59 IST

अहमदनगर : शनिशिंगणापूर व तत्सम देवस्थानांमध्ये महिलांना दर्शन व पूजा करण्याची कायद्यानेच परवानगी दिल्याने देवस्थान समिती व ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका घेणे चुकीचे आहे़

अहमदनगर : शनिशिंगणापूर व तत्सम देवस्थानांमध्ये महिलांना दर्शन व पूजा करण्याची कायद्यानेच परवानगी दिल्याने देवस्थान समिती व ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका घेणे चुकीचे आहे़ देवस्थानात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना शासनाने संरक्षण द्यावे, अशी भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मांडली़ तसेच शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी गेलेल्या महिलांना झालेल्या मारहाणीचा पाटील यांनी निषेध केला़ पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर, महालक्ष्मी मंदिर व इतर हिंदू देवस्थानांच्या ठिकाणी महिलांना प्रवेश देणे १९५६ सालच्या कायद्याने बंधनकारक आहे़ याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची व कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे़ स्थानिक जिल्हा प्रशासनाने योग्य भूमिका घेणे गरजेचे आहे़ अंनिसतर्फे डिसेंबर २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामध्ये महाराष्ट्र शासन, धर्मादाय आयुक्त, शनिशिंगणापूर देवस्थान व महालक्ष्मी देवस्थान यांना प्रतिवादी करण्यात आले होते़ न्यायालयाने त्यांचे मत मागून घेतले, परंतु नंतरच्या कालावधीत सदर याचिकेची होऊ शकली नाही़ भूमाता ब्रिगेडच्यावतीने शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरू झाले़ त्याला स्थानिकासह विश्वस्तांनी विरोध केला़ जिल्हा प्रशासनाचेही त्यांचेच समर्थन केल्याने त्याविरोधात अंनिसने ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन केले़ यावेळी दिलेल्या निवेदनाला नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही़ न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मात्र, अंनिसने गेली अठरा वर्षे केलेल्या संघर्षाला यश आले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आता स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनाची असल्याचे पाटील म्हणाले़ यावेळी कॉ़ बाबा आरगडे, अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षा रंजना गवांदे, अर्जुन हरेल, महेश धनवटे, डॉ़ प्रकाश गरुड आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)