पुण्याकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल जामनेरनजीक उलटली; ८ ते १० प्रवाशी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 22:16 IST2025-06-01T22:16:20+5:302025-06-01T22:16:50+5:30

या जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. इतर जखमींना रुग्णालयात आणले जात आहे.

Private travel vehicle heading to Pune overturns near Jamner; 8 to 10 passengers injured | पुण्याकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल जामनेरनजीक उलटली; ८ ते १० प्रवाशी जखमी

पुण्याकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल जामनेरनजीक उलटली; ८ ते १० प्रवाशी जखमी

लियाकत सय्यद

जामनेर(जि. जळगाव)  : भुसावळहून पुण्याकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल बस उलटून ८ ते १० प्रवासी जखमी झाले. ही घटना गंगापुरी ते गारखेडे ता. जामनेर या गावादरम्यान रविवारी रात्री ९  वाजेच्या सुमारास घडली. 

रस्त्याचे काम सुरु असल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती जामनेरला मिळताच येथील रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहचल्या. बेबाबाई घाडे (७५), साहील घाडे (८ दोन्ही रा.खिरोदा) , ललिता इंगळे (४०), दिशा इंगळे (८, दोन्ही रा.बऱ्हाणपूर), योगेश चौधरी (३४) आणि रणजित राजपूत (३०, दोन्ही रा. भुसावळ)  या जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. इतर जखमींना रुग्णालयात आणले जात आहे.

Web Title: Private travel vehicle heading to Pune overturns near Jamner; 8 to 10 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात