शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
4
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
5
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
6
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
7
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
8
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
9
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
10
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
11
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
12
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
13
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
14
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
15
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
16
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
17
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
18
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
19
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
20
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार

निवडणूक पार्श्वभूमीवर नगरमध्ये ३६१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; तिघे हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 13:02 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यातील तिघांना जिल्ह्यातून हद्दपार, तर ३६१ जणांना अटी-शर्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यातील तिघांना जिल्ह्यातून हद्दपार, तर ३६१ जणांना अटी-शर्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी या कारवाईचे आदेश दिले. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून जिल्हा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ज्यांच्यावर एक किंवा एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांना निवडणुकीच्या काळात शहरातून, जिल्ह्यातून हद्दपार करावे किंवा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव  पोलिसांकडून प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे दाखल झाले होते. त्यात शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक, तसेच राजकीय पदाधिका-यांचा समावेश आहे. सुनील अंबादास तांबे (रा. घोडेगाव, ता. नेवासा) याला सहा महिन्यासाठी, तर आश्पाक उर्फ बाबा निसार शेख (रा. चांदा, ता. नेवासा) व गोरख करांडे (रा. देहरे, ता. नगर) या दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.कोतवाली १०६, नगर तालुका २४, तोफखाना ९२, एमआयडीसी ३८, तर भिंगार पोलीस ठाण्यातून १०१ अशा एकूण ३६१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दिलीप सातपुते, सुवेंद्र गांधी, संभाजी कदम, विक्रम राठोड, विनीत पाऊलबुधे, स्वप्निल रोहिदास शिंदे, निखिल बाबासाहेब वारे, कुमार वाकळे, सचिन तुकाराम जाधव, चत्तर निसार शेख,स्वप्निल अशोक ढवण, निलेश भाकरे, दिगंबर गेंट्याल,अंकुश मोहिते,  ओमकार भागानगरे, श्रीकांत छिंदम, संदीप जाधव, शेख मन्सूर शेख आसिफ शेख,  शहानवाज सय्यद, तनवीर पठाण, वैभव वाघ, श्रीकांत मुर्तडक, राकेश वाडेकर, गोपाल मालवानी, रोहित फड, आदित्य गवळी, प्रमोद नेटके, संतोष सेंदर, प्रशांत सेंदर, वसीम शेख, रशीद सलमान शेख, मोहसीन खान सलमान, आरिफ खान, दीपक सचिन महाजन, अजिंक्य म्हस्के, शेख वसीम, रफिक शेख, रिजवान रशीद आदींसह ३६१ जणांचा त्यात समावेश आहे. १९ ते २४ आॅक्टोबरदरम्यान शहरात कायदा-सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी, रोज सायंकाळी सहा वाजता आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, अशा काही अटी-शर्तींवर या सर्वांना शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग