शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाकडे गर्भवतींनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

--------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनावरील लस घेण्याबाबत गरोदर मातांमध्ये संभ्रम असून, गेल्या आठ दिवसांत केवळ ५० महिलांनीच ...

---------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनावरील लस घेण्याबाबत गरोदर मातांमध्ये संभ्रम असून, गेल्या आठ दिवसांत केवळ ५० महिलांनीच फक्त लस घेतली आहे. दररोज साधारण एक किंवा दोन महिला लस घेण्यासाठी येत असल्याने त्यांनाही लस देणे शक्य होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात गर्भवती महिलांना कोरोनावरील लस देण्यात येत आहे. गेल्या सोमवारपासून गर्भवती महिलांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या दिवशी २० गर्भवती महिलांना लस देण्यात आली. त्यानंतर लस घेणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या घटली असून, लसीकरण मोहीम थंडावली आहे. रुग्णालयात नियमित तपासणीसाठी येणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्यासाठी दोन आरोग्यसेविकांची महापालिकेने नियुक्ती केली आहे; परंतु लस घेण्यास गर्भवती महिलांकडून नकार दिला जातो. एक किंवा दोन महिला लस घेण्यास तयार झाल्या तरी त्यांना लस देता येत नाही. कारण एकावेळी किमान १० डोस द्यावे लागतात. त्यापेक्षा कमी संख्या असल्यास डोस वाया जातात, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

गर्भवती महिलांना लस देण्याचा शासनाचा आदेश आहे. गर्भवती महिलांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी पालिकेने स्वतंत्र रुग्णालयात लस देण्याची सोय केली; परंतु गर्भवती महिलांनीच लसीकरणाकडे पाठ फिरविल्याने प्रशासनाचाही नाइलाज झाला आहे.

....

गर्भवती महिलांनी का घ्यावी लस?

आतापर्यंतच्या अनुभवावरून असे लक्षात आले आहे की, गर्भवती स्त्रियांमध्ये कोविडचा संसर्ग झाल्यास त्यांना अतिशय तीव्र आजार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच गर्भवती स्त्रियांमध्ये कोविडचा संसर्ग झाल्यास कमी दिवसाच्या बाळाचा जन्म होण्याची तसेच बाळाला इतर त्रास होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची काळजी घ्यावी. कोरोना लसीकरणामुळे होणारा दुष्परिणाम हे कोविड लसीकरणापेक्षा खूपच कमी तीव्रतेचे असतात, असे डॉ. सचिन वाहाडणे यांनी सांगितले.

......

एकूण लसीकरण

१ लाख २२ हजार ७८१

पहिला डोस- ८६ हजार ४२९

दुसरा डोस- ३७ हजार ८८९

.....