शेतक-याच्या बागेतील दीड लाख रूपयांचे डाळिंब चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 14:02 IST2020-06-27T14:01:14+5:302020-06-27T14:02:14+5:30

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील माळवदवाडी (आंबी खालसा) येथील एका शेतक-याच्या डाळिंब बागेतून चोरट्यांनी शुक्रवारी (२६ जून) रात्री सुमारे दीड लाख रूपयांचे डाळिंब चोरून नेले. 

A pomegranate worth Rs 1.5 lakh was stolen from a farmer's orchard | शेतक-याच्या बागेतील दीड लाख रूपयांचे डाळिंब चोरीला

शेतक-याच्या बागेतील दीड लाख रूपयांचे डाळिंब चोरीला

घारगाव : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील माळवदवाडी (आंबी खालसा) येथील एका शेतक-याच्या डाळिंब बागेतून चोरट्यांनी शुक्रवारी (२६ जून) रात्री सुमारे दीड लाख रूपयांचे डाळिंब चोरून नेले. 

संदीप भाऊसाहेब डोके यांच्या बागेत ही चोरी झाली आहे.  शनिवारी (२७ जून) सकाळी चोरी झाल्याचे डोके यांना समजले. त्यांनी बागेत जावून पहिले असता झाडाला लागलेले डाळिंब चोरट्यांनी चोरून नेले. या घटनेची माहिती त्यांनी घारगाव पोलिसांना दिली. 

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून डाळिंब चोरी प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी देखील संगमनेर तालुक्यात शेतक-यांचा शेतीमाल चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. 

Web Title: A pomegranate worth Rs 1.5 lakh was stolen from a farmer's orchard