शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

बहुरूपीचा मुलगा बनला पीएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST

तान्हाजी शेगर यांचे प्राथमिक शिक्षण ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण सोनई येथील आदर्श विद्या मंदिर व ...

तान्हाजी शेगर यांचे प्राथमिक शिक्षण ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण सोनई येथील आदर्श विद्या मंदिर व दादासाहेब रुपवते विद्यालय नगर येथे झाले. पुढे डीएड केले. दरम्यान पोलीस भरतीत उतरण्याचा निर्धार केला अन् पहिल्याच प्रयत्नात यश आले. १० फेब्रुवारी २००९ पासून पुणे शहरातील बंडगार्डन, वाहतूक शाखा व अलंकार पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावले. सध्या एसीपी कार्यालय सिंहगड येथे कार्यरत आहेत. दरम्यान पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २०११ पासून एमपीएससी परीक्षा देत होते. अनेकदा प्रयत्न केले. अखेर अथक परिश्रमानंतर २०१७ मध्ये पार पडलेल्या एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निकाल लागण्यास विलंब झाला. १० फेब्रुवारी २०२१ रोजी निकाल लागला. योगायोग असा की तान्हाजी शेगर हे याच तारखेला (१० फेब्रुवारी २००९) पोलीस सेवेत दाखल झाले. १२ वर्षाच्या पोलीस सवेत त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कर्तव्य बजावताना सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजावली. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले तान्हाजी शेगर यांनी शिक्षण घेत असताना बालपणी सुट्टीच्या दिवसात बहुरूपीचे काम केले.

कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी बालपणी बनावट पोलीस बनून रायरंदची भूमिका केली. पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदारी फिरले. त्याच वेळी भविष्यात पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. अन् आज ते सत्यात उतरले.

तान्हाजी यांना दोन भाऊ व चार बहिणी आहेत. भाऊ आजही बहुरूपीचे काम करतात. वडील सर्जेराव यांनी सुरुवातीपासून कुटुंब व समाजासाठी संघर्ष केला. नाथपंथी डवरी गोसावी समाजाचेते अध्यक्ष आहेत. समाजाच्या विविध प्रश्नबाबत त्यांचा कायम पुढाकार असतो.

........................

तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना उद्योग व्यवसाय व प्रशासकीय नोकरीसाठी मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय योग्य तेवढी मदत करू. पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालो. भविष्यात पोलीस प्रशासनातील आणखी वरिष्ठ पदावर जाण्याचा प्रयत्न आहे. - तान्हाजी शेगर, पोलीस उपनिरीक्षक

............

तान्हीजी शेगर