Ahmednagar: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

By शेखर पानसरे | Updated: July 14, 2023 09:25 IST2023-07-14T09:23:14+5:302023-07-14T09:25:06+5:30

Ahmednagar: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा शिवारात गुरुवारी (दि.१३)रात्री पावणे बाराच्या सुमारास झाला.

Policeman killed in collision with unknown vehicle | Ahmednagar: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Ahmednagar: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

- शेखर पानसरे
घारगाव - अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा शिवारात गुरुवारी (दि.१३)रात्री पावणे बाराच्या सुमारास झाला.

पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम देवराम रोंगटे (बक्कल नंबर - २३९३, वय- ३२ वर्षे , रा.सावरकुटे , ता.अकोले जि.अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते घारगाव पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत होते.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम रोंगटे यांना गुरुवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास नाशिक - पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर आंबी खालसा गावचे शिवारात अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात रोंगटे हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद घारगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस कॉन्स्टेबल महादेव रामचंद्र हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकाविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत.

Web Title: Policeman killed in collision with unknown vehicle