मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणारा पोलीस निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 16:23 IST2017-10-15T16:23:02+5:302017-10-15T16:23:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे.

Police suspended on social media against Modi | मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणारा पोलीस निलंबित 

मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणारा पोलीस निलंबित 

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. रमेश शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून काल त्याला निलंबन करण्यात आल्याचं समजतय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून रमेश शिंदे हे कार्यरत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली.
त्यानंतर शिंदे यांच्या मोबाईलवरुन संबंधीत मेसेज व्हायरल झाल्याचं आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र एका राजकीय नेत्याच्या अंगरक्षकाने पंतप्रधानांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण व्हायरल केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात आतापर्यंत सोशल मीडियावर लिखाण करणार्‍यांना नोटिसा आल्या आहेत. मात्र एखाद्या सरकारी व्यक्तीच्या निलंबनाची कदाचित ही पहिलीच घटना आहे.

'त्या' तरूणांना शरद पवारांची साथ, म्हणाले....मी तुमच्या पाठीशी आहे

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये सरकारच्या विरोधी लिहीलं म्हणून अनेक तरूणांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्या तरूणांनी काल मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू, असे आश्वासन शरद पवारांनी यावेळी तरूणांना दिले. एखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय पाठवू शकतात, असा सवालही त्यांनी फडणवीस सरकारला केला आहे. याबाबत शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली. 

Web Title: Police suspended on social media against Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.