पोलीस कर्मचाऱ्याच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:21 IST2021-05-10T04:21:07+5:302021-05-10T04:21:07+5:30

अहमदनगर : महिलेला अश्लील मेसेज पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने तोफखाना ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याविरोधात रविवारी विनयभंगाचा गुन्हा ...

Of a police officer | पोलीस कर्मचाऱ्याच्या

पोलीस कर्मचाऱ्याच्या

अहमदनगर : महिलेला अश्लील मेसेज पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने तोफखाना ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याविरोधात रविवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोनवणे याने पीडित महिलेच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविले होते. दरम्यान, यासंदर्भात सदर महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनेची शहानिशा केल्यानंतर सोनवणे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल होताच सोनवणे याला अटक करण्यात आली असून, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी यासंदर्भातील अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. याप्रकरणी निरीक्षक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील पीडित महिला एका पोलीस कर्मचाऱ्याची आई आहे. सोनवणे हा पोलीस निरीक्षक गायकवाड यांचा रायटर म्हणून काम करीत होता.

Web Title: Of a police officer