शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक पिशवीत अनामत रक्कम आणली; नेवाशातील उमेदवाराला पाच हजाराचा दंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 14:55 IST

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीत आणल्याने एका उमेदवाराला पाच हजार रूपयांचा दंड भरावा लागला. सोमवारी (दि.३०) दुपारी नेवासा येथे हा प्रकार घडला.

नेवासा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीत आणल्याने एका उमेदवाराला पाच हजार रूपयांचा दंड भरावा लागला. सोमवारी (दि.३०) दुपारी नेवासा येथे हा प्रकार घडला.नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे असे कारवाई झालेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होताच प्लॅस्टिक बाळगल्याने अशी कारवाई झाल्याने तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.देवगाव येथील मुंगसे यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी दहा हजाराची चिल्लर आणली होती. त्यामध्ये पाचशे रूपयाचे वीस बंडल प्लॅस्टिक पॅकेटमध्ये आणले होते. प्लॅस्टिक बंदी असताना सदरची रक्कम ही प्लॅस्टिकमध्ये आणल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे व नगरपंचायतचे मुख्याधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी समीर शेख यांच्या लक्षात आले. त्यांनी मुंगसे यांना पाच हजाराचा दंड ठोठावला.यावेळी दंड भरताना एक हजाराची चिल्लरसह पाच हजार रुपये भरून दंडाची पावती व उमेदवारी अर्ज भरताना एक हजाराच्या चिल्लरसह दहा हजाराची अनामत रक्कम मुंगशे यांना भरावी लागली. नेवासा येथे नगरपंचायत आहे. नगरपंचायत असूनही येथे प्लॅस्टिकविरोधी फारसी कारवाई झालेली नाही. मात्र आजच्या या कारवाईने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAhmednagarअहमदनगर