फिनिक्सची निस्वार्थ आरोग्य सेवा प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST2021-07-13T04:06:32+5:302021-07-13T04:06:32+5:30

केडगाव : फिनिक्स फाउंडेशनने कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांना आधार दिला. समाजाची गरज ओळखून कोरोना काळात मोफत शिबिर राबवून अनेकांच्या ...

Phoenix’s selfless healthcare inspiration | फिनिक्सची निस्वार्थ आरोग्य सेवा प्रेरणादायी

फिनिक्सची निस्वार्थ आरोग्य सेवा प्रेरणादायी

केडगाव : फिनिक्स फाउंडेशनने कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांना आधार दिला. समाजाची गरज ओळखून कोरोना काळात मोफत शिबिर राबवून अनेकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया घडवून आणल्या. निस्वार्थ भावनेने फिनिक्सची अविरतपणे सुरू असलेली आरोग्य सेवा प्रेरणादायी असल्याची भावना महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केली.

फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष अर्जुन बोरुडे, राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे, फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, बाबासाहेब धीवर, राजेंद्र बोरुडे, गौरव बोरुडे, डॉ. विशाल घंगाळे आदी उपस्थित होते. या शिबिरात ३७८ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी केली. ओमकार वाघमारे, किरण कवडे यांनी रूग्णांची तपासणी केली. ७३ गरजू रूग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी गरजूंना मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन बाबासाहेब धीवर यांनी केले. गौरव बोरुडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशील थोरात, सौरभ बोरुडे, ओंकार वाघमारे, डॉ. संजय शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

110721\2655img-20210711-wa0198.jpg

नेत्र तपासणी

Web Title: Phoenix’s selfless healthcare inspiration