शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रास्ते अलग मगर मंजिल एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST

कर्जत : शहरातील विविध सामाजिक संघटनांनी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिवशी सुरू केलेला सामूहिक श्रमदानातून स्वच्छता अभियानाचा ...

कर्जत : शहरातील विविध सामाजिक संघटनांनी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिवशी सुरू केलेला सामूहिक श्रमदानातून स्वच्छता अभियानाचा उपक्रम आज देखील अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमाला कर्जत शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचा आदर्श घेऊन कर्जत तालुक्यातील अनेक गावात हे अभियान सुरू झाले आहे. हे अभियान लवकरच शतक पूर्ण करेल.

कर्जत नगरपंचायतीने स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ मध्ये सहभाग घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन श्रमदानातून स्वच्छता अभियान सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत एकाही दिवसाची सुट्टी न घेता हे अविरतपणे सुरू आहे. कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आम्ही कर्जतचे सेवेकरी या बॅनरखाली अविरतपणे स्वच्छता अभियान सुरू ठेवले आहे. तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले यांनी कर्जत शहराला नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी बाभूळ मुक्त कर्जत हे अभियान सुरू केले आहे. पाच जेसीबीच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. दररोज कर्जत शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात येत आहे. काम जरी वेगवेगळ्या ठिकाणी होत असले तरी त्यांचे ध्येय एकच आहे. ते म्हणजे कर्जत शहराची स्वच्छता. यामुळे याला ‘रास्ते अलग मगर मंजिल एक...’ असे संबोधले तरी वावगे ठरणार नाही.

कर्जत शहरात सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छता अभियानामध्ये कर्जत शहरातील पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी, शिक्षक, कर्मचारी, महिला, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सध्या कोरोनाचे संकट असताना देखील नियमांचे काटेकोरपणे पालन करत हे अभियान सुरू आहे. कर्जत नगरपंचायतीचे सफाई कामगार दिवसातून दोन वेळा साफसफाई करतात. यामुळे कर्जत शहर स्वच्छ दिसत आहे. सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था परिसर, मंदिर परिसर, बाजारपेठ, रस्ते, याचे रूप पालटले आहे. यामुळे कर्जत नगरपंचायत नक्कीच या स्पर्धेत मोठे यश मिळवेल, असा विश्वास कर्जतकरांना आहे.

...

जनजागृतीसाठी स्वच्छता रथ

कर्जत शहरातील स्वच्छता अभियानाचा आदर्श तालुक्यातील राशीन, सिद्धटेक, कोळवडी, बहिरोबावाडी यांनी घेतला आहे. तेथे स्थानिक ग्रामस्थ व युवकांनी एकत्र येऊन हे काम सुरू केले आहे. शेजारच्या श्रीगोंदा या तालुक्याच्या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. कर्जत शहरातील सामाजिक कार्यकर्ते अभय बोरा यांनी दररोज सकाळी श्रमदान करण्यासाठी जे साहित्य लागते. त्याची वाहतूक करणे व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गाडी डिझेल टाकून विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. जनजागृतीसाठी रथ तयार केला आहे.

...

फोटो ०२कर्जत अभियान

...

ओळी- कर्जत शहरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी तयार केलेला रथ.