संत ज्ञानेश्वर महाराज जयंती व श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गुरुवर्य बन्सी महाराज तांबे बाबांनी सुरू केलेल्या पारायण सोहळयाचे हे ६४ वे वर्ष आहे. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या पारायण सोहळयात सकाळी ७ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरीचे वाचन होत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे दरवर्षी होणारे अन्नदान कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दुपारी ४ ते ५ या वेळेत प्रवचन सेवेनंतर मंदिर सभामंडप पुन्हा बंद करण्यात येत आहे.
गोकुळाष्टमीनिमित्ताने ३० ऑगस्ट रोजी रात्री १० ते १२ या वेळेत जन्मोत्सव व संत ज्ञानेश्वर माऊलींची जयंती मोजक्याच भाविकांमध्ये साजरी करण्यात येणार आहे. दि. ३१ ऑगस्ट रोजी या सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. सोहळा साध्या पद्धतीने साजरा होत असल्याने तसेच मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख यांनी केले आहे.