सैन्य, पोलीस भरतीचे आयोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:12+5:302021-06-29T04:15:12+5:30
पत्रात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. ...

सैन्य, पोलीस भरतीचे आयोजन करा
पत्रात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. याही परिस्थितीतून आपला देश सावरत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून भारतीय सैन्य दलाची, तसेच महाराष्ट्र पोलीस दलाची एकही भरती निघालेली नाही. बऱ्याच काळापासून शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे पाल्य भरतीसाठी तयारी करत आहेत. परंतु कोरोनामुळे भरती न निघाल्यामुळे मुलांचे वय निघून गेले आहे आणि तरुण मुले हताश बनली आहेत. यामुळे लाखो मुलांचा स्वप्नभंग होत आहे. तरुणांचे भविष्य टांगणीला लागले आहे. याचा विचार करून सैन्य भरती आयोजित करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्य प्रवक्ते संतोष पवार आणि जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना या माध्यमातून वयाची अट १ वर्ष शिथिल करावी. या एका निर्णयामुळे कित्येक युवकांचे भविष्य अंधारमय होण्यापासून वाचू शकते, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.