शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेवरून विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST

प्रशासनाच्या नियोजनानुसार १४ जूनला सर्वसाधारण सभा होणार आहे. जिल्हा परिषद अधिनियमानुसार दर तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेणे ...

प्रशासनाच्या नियोजनानुसार १४ जूनला सर्वसाधारण सभा होणार आहे. जिल्हा परिषद अधिनियमानुसार दर तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. या नियमानुसार येत्या २४ जूनला मागील सर्वसाधारण सभेचा तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होणार होता. दुसरीकडे नगरसह राज्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीत सुधारणा होत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता अथवा मोठी सवलत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे १५ जूननंतर ही सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात घेता आली असती, असा आक्षेप विरोधी सदस्यांनी घेतला आहे. सत्ताधारी पदाधिकारी आणि प्रशासन यांनी जाणीवपूर्वक ही सभा प्रत्यक्षात न घेता ऑनलाइन घेतल्याचा आरोप विरोधी सदस्य करत आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन होत असल्याने अनेक सदस्यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलण्याची संधी मिळालेली नाही. यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे.

जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासन विरोधकांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी जाणीवपूर्वक सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेत असल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात पालकमंत्री, महसूल अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी बैठका घेत असून, या बैठकीला मोठ्या संख्येने अधिकारी आणि कार्यकर्ते हजर राहतात. त्या ठिकाणी कोरोना संसर्गाची भीती नाही का? असा सवाल उपस्थित करत ही सर्वसाधारण सभा लॉकडाऊन उघडल्यानंतर ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, ज्येष्ठ सदस्य राजेश परजणे, शरद नवले, हर्षदाताई काकडे आदींनी केली आहे.

--------------

१५ जूननंतर राज्यात लॉकडाऊन उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा १५ नंतर घेतली तर ऑफलाइन घेता येईल. सदस्यांना अनेक मुद्दे मांडायचे आहेत, परंतु सत्ताधारी त्याला घाबरत असून, त्यांनी मुद्दाम १४ जूनला ऑनलाइन सभा ठेवली आहे.

- जालिंदर वाकचौरे, गटनेते भाजप

--------------

गेल्या एक-दीड वर्षांपासून सर्वसाधारण सभा ऑनलाइनच होत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत नाही. प्रशासनाने लॉकडाऊन उघडल्यानंतर ही सभा प्रत्यक्ष सभागृहात सर्व सदस्यांच्या उपस्थित घ्यावी.

- राजेश परजणे, जि. प. सदस्य