ओझर खुर्द शिवारात दोन बिबट्याची लढाईत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:51+5:302021-08-28T04:24:51+5:30
ओझर खुर्द शिवारातील नेमबाई माळ परिसरात डाळिंब पिकाला औषध फवारणी करण्यासाठी चाललेल्या मजुरांना येथील शेतकरी शंकर आनंदा शिदें शेतात ...

ओझर खुर्द शिवारात दोन बिबट्याची लढाईत एकाचा मृत्यू
ओझर खुर्द शिवारातील नेमबाई माळ परिसरात डाळिंब पिकाला औषध फवारणी करण्यासाठी चाललेल्या मजुरांना येथील शेतकरी शंकर आनंदा शिदें शेतात गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास एक बिबट्या निपचित पडलेला दिसला. त्यामुळे या मजुरांची भीतीने गाळण झाली. परंतु बराच वेळ होऊनही हालचाल होत नसल्याने धाडस करत थोडे जवळ पाहिले. शेतकरी शंकर शिंदे यांना माहिती मिळताच त्यानी वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान हा मृत बिबट्या हा अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा मादी बिबट्या असून दोन बिबट्याच्या भांडणात या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर या मृत बिबट्यावर निबांळे येथील नर्सरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.