शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

धामोरी खुर्दमध्ये शंभर टक्के लसीकरणाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

डॉ. सतीश सोनवणे यांच्या पुढाकारातून गावात शनिवारी (दि.४) शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. ...

डॉ. सतीश सोनवणे यांच्या पुढाकारातून गावात शनिवारी (दि.४) शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मॅककेअरचे संचालक डॉ. प्रशांत पटारे, डॉ. अविनाश जाधव, सरपंच सुनीता पवार, उपसरपंच मच्छींद्र सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, डॉ. नीलेश उगले, बाबासाहेब सोनवणे, भाऊसाहेब जाधव, सहायक पोलीस निरीक्षक खेडेकर, ग्रामसेविका वाघ यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. शिबिराच्या पहिल्याच दिवशी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांव्यतिरिक्त सर्वांचे लसीकरण करण्यात आले.

डॉ. सतीश सोनवणे हे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य परिषदांमध्ये सहभागी झालेले आहेत. कोरोनाविषयक टास्क फोर्समध्ये काम करून आरोग्य विभागाला मार्गदर्शन करतात. डॉ. सोनवणे यांनी लसीकरणाबाबत जनतेला फक्त आवाहन न करता स्वखर्चाने लसीकरण करण्याचा निर्णय घेत समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करताना डॉ. संदीप सांगळे म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येक नागरिकाच्या लसीकरणासाठी डॉ. सोनवणे यांच्या स्तुत्य उपक्रमाचा आदर्श ठेवत इतरांनीही असे उपक्रम राबविण्याची गरज आहे. डॉ. प्रशांत पटारे यांनी धामोरी खुर्द गावातील ज्या व्यक्तींचे लसीकरण राहिले असेल त्यांनी नगर शहरात मॅककेअर हॉस्पिटलमध्ये येऊन मोफत लस घ्यावी असे आवाहन केले. यावेळी त्र्यंबक सोनवणे, रावसाहेब सोनवणे, रामनाथ सोनवणे, अभय सोनवणे, रामनाथ शिंदे, संदीप सोनवणे, दिनकर गायके, बापूसाहेब जाधव, खंडू पाटील जाधव, सतीश हरिश्चंद्रे, गोरख जाधव, विकास हरिश्चंद्रे, देवराम खेडेकर, भारत पुरी, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते. (वा.प्र.)

फोटो ०५ लसीकरण

ओळी- धामोरी येथे शिबिरात ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. सतीश सोनवणे, डॉ. संदीप सांगळे, डॉ. प्रशांत पटारे आदी.