शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

‘मुळा’त अवघा दीड टीएमसी जीवंत साठा

By admin | Updated: June 3, 2014 00:27 IST

राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, आता केवळ १ हजार ६९१ दलघफू जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे.

राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, आता केवळ १ हजार ६९१ दलघफू जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या १३२५ क्युसेकने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ सध्या धरणात ६ हजार १८१ दलघफू पाणीसाठा असून, त्यातील ४५०० दलघफू मृतसाठा आहे. उजवा कालवा सुरू असल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत आहे. उजव्या कालव्याखालील पाण्याची मागणी सुरूच आहे़त्यामुळे आणखी किती पाणी लागेल व कालवा किती दिवस चालेल याबाबत पाठबंधारे खातेही रामभरोस आहे़ कालवा बंद होण्याच्या अगोदर तीन तास पाटबंधारे खात्याला शेतीचे भरणे पूर्ण झाल्याचे कळणार आहे़ टेल भागात अजूनही पाण्याची मागणी कायम आहे़ पावसाळा लांबल्याने शेतकर्‍यांपुढे पेरणी करण्याचे आव्हान आहे़ मुळा धरणाचा डावा कालवा दहा दिवसांपूर्वीच बंद झाला आहे़ डाव्या कालव्यातून ७०० दलघफू पाण्याचा वापर झाला आहे़ पावसाने प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने श्ोतकरी दुहेरी पध्दतीने पिकाचे भरणे करीत आहेत़ उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने पाण्याची असलेली जमिनीची भूक वाढत आहे़ मुळा धरणात पिण्यासाठी व उद्योगासाठी जुलैअखेर पुरेल इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे़ शिवाय राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला वाटेल तेवढे पाणी धरणातून संशोधनासाठी मिळणार आहे़ मुळा डावा कालव्याखाली असलेल्या मुसळवाडी तलावात पाणी सोडण्यास पाटबंधारे खात्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही़ (तालुका प्रतिनिधी)