खर्डा बसस्थानकाची जुनी इमारत मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:56+5:302020-12-13T04:34:56+5:30
खर्डा : शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावर नव्याने सुसज्ज बसस्थानक होत असतानाच दुसरीकडे जुनी मोडकळीस आलेली इमारत धोकादायक झाली आहे. यामुळे ...

खर्डा बसस्थानकाची जुनी इमारत मोडकळीस
खर्डा : शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावर नव्याने सुसज्ज बसस्थानक होत असतानाच दुसरीकडे जुनी मोडकळीस आलेली इमारत धोकादायक झाली आहे. यामुळे सध्या तरी प्रवाशांची गैरसोय होत आहे.
मध्यंतरी एसटी महामंडळाने नव्याने आदेश काढून महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटनाने क्षेत्र असणाऱ्या बसस्थानकांची इमारत सुसज्ज करण्याचे ठरवले. त्याच धर्तीवर खर्डा बसस्थानकाचे काम चालू आहे; परंतु मध्यंतरीच्या कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन होते. या काळात इमारत बांधकाम बंद होते. पुन्हा नव्याने चालू झालेल्या कामामुळे शेजारील जुनी इमारत धोकादायक झाली आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे.
प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शौचालय नाही. महिला प्रवाशांची लघुशंकेसाठी मोठी कुचंबणा होते. प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे तुटलेल्या अवस्थतेत असून प्रवाशांना उभे राहण्याची पाळी येत आहे.