शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी निवडीचे वारे

By admin | Updated: June 9, 2023 13:18 IST

अहमदनगर: जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला़

अहमदनगर: जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला़ जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीसाठी सभा घेण्याची नोटीस जिल्हा परिषदेला बजावली असून, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची २१ ला तर पंचायत समिती सभापती व उपसभापतींची १४ सप्टेंबर रोजी निवड होणार आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पदाधिकारी निवडीचे वारे वाहू लागले आहेत़ जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व उपाध्यक्ष मोनिका राजळे यांचा कार्यकाल येत्या २१ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे़ त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी नव्याने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे़ या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कवडे यांनी जाहीर केला आहे़ त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या निवडी करण्यात येणार असून, निवडणुकीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत़ विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर हा कार्यक्रम जाहीर झाला़ त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले असून, विधानसभा निवडणुकीची समीकरणे यामुळे बदलण्याची शक्यता आहे़ तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या पंचायत समिती सभापतींचीच निवडणूक होत आहे़ त्यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे़अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सभा घेण्यात येईल़ पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कवडे सभेला असणार आहेत़ जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही पदांसाठी सभागृहात निवडणूक होईल़ अर्ज दाखलसाठी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत मुदत असणार आहे़ दुपारी तीन वाजता होणाऱ्या सभेत प्राप्त अर्जाची छाननी करून माघारी घेण्यासाठी मुदत दिली जाईल़ अर्जांची छाननी व माघारीचा कालावधी संपल्यानंतर आवश्यकता भासल्यास निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे़ पंचायत समिती सभापती पदासाठी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सर्व पंचायत समिती सभागृहात सभा घेण्यात येणार आहे़ सर्व पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींसाठी एकाच दिवशी निवडणूक होत आहे़ पिठासीन अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, तसे पत्र पंचायत समित्यांना देण्यात आले आहेत़ अर्ज दाखलसाठी सकाळी ११ ते १ पर्यंत मुदत राहिल़ अर्जाची छाननी करून आवश्यकता भासल्यास सभापती व उपसभापतींसाठी निवडणूक घेतली जाणार आहे़ (प्रतिनिधी)