नगरमधील कॅफेमध्ये अश्लील चाळे, पाच ठिकाणी छापे

By अण्णा नवथर | Updated: December 9, 2023 16:10 IST2023-12-09T16:10:18+5:302023-12-09T16:10:25+5:30

पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Obscenity in cafes in the city, raids at five places | नगरमधील कॅफेमध्ये अश्लील चाळे, पाच ठिकाणी छापे

नगरमधील कॅफेमध्ये अश्लील चाळे, पाच ठिकाणी छापे

अहमदनगर: शहरातील सावेडी उपनगरात कॅफेमध्ये पडदे लावून अश्लील चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरात बाहेरून पडदे लावून सर्रास कॅफे चालवत असल्याची गाेपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. तोफखाना पोलिसांनी सावेडीतील कोहिनूर आर्केड बिल्डींग, डाऊन कॅफे, हंगरेला कॅफे, द व्हेनी कॅफे आणि वनस्टार कॅफेवर छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी फरहाण सरफराज शेख ( वय २८ वर्षे, रा. केडगाव), शक्ती मनोहर सिंग ( वय २१ वर्षे, रा. भिमा सकर, राजस्थान), विशाल भाऊसाहेब पालवे ( वय २४ वर्षे, रा. कोल्हार, पाथर्डी), रंजीज जवाहर पंडीत ( वय २० वर्षे, रा. इंदरानगर, पुणे), ओंकार कैलास ताठे ( वय २३ वर्षे, रा. ताठेनगर, सावेडी) या कॅफे चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी शुक्रवारी रात्री कॅफेंवर छापे टाकले असता पडदे लावून अंधार करण्यात आलेला होता. अंधारात काही मुले व मुली अश्लील चाळे करताना दिसून आली. त्यांना समजून देऊन सोडून देण्यात आले. ही कारवाई पोलिस निरिक्षक मधूकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

Web Title: Obscenity in cafes in the city, raids at five places