शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

अवास्तव अंदाजपत्रकावर सदस्यांचा आक्षेप

By admin | Updated: October 23, 2024 13:32 IST

अहमदनगर: अंदाजपत्रकातील अवास्तव तरतुदी प्रशासनाच्या चांगल्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत़ संकलित करातून प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न कमी आहे,

अहमदनगर: अंदाजपत्रकातील अवास्तव तरतुदी प्रशासनाच्या चांगल्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत़ संकलित करातून प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न कमी आहे, परंतु अंदाजपत्रकात हा आकडा फुगविला कसा, महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडण्याचे खरे मूळ यातच आहे, असे सांगून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले़ दरम्यान सभा तहकूब करून बुधवारी पुन्हा अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचे यावेळी ठरले़ सभापती किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीच्या सुरू झालेल्या सभेत २०१४-१५ अंदाजपत्रकावर चर्चेला सुरुवात झाली़ पहिल्याच दिवशी सदस्यांनी प्रशासनाला लक्ष्य केले़ अंदाजपत्रक वास्तव नाही, अशी टीका सदस्यांनी केली़ सभेच्या सुरुवातीला लेखा परीक्षणाच्या अहवालाची मागणी करत सदस्यांनी गोंधळ घातला़ त्यासाठी सभा काही वेळासाठी तहकूब करण्यात आली़ अर्ध्या तासानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली़ सुरुवातीला आरोग्य विभागाचा दरवाढीचा प्रस्ताव सदस्यांनी फेटाळला़ ही वाढ कायदेशीर नसल्याचे कारण सदस्यांनी दिले़ महापौर दुर्धर आजार अर्थसहाय्य निधीचा ठराव कोणी केला, त्याचे निकष काय आहेत, असा सवाल बाळासाहेब बोराटे यांनी उपस्थित केला़ आर्थिक स्थिती बिकट असल्याने ही मदत देणे योग्य नाही, त्यासाठी शहरातील दानशूर व्यक्तीकडून निधी मदतीचे आवाहन करून त्यातून ही मदत करावी, अशा सूचना लेखा परीक्षकांनी दिल्या असल्याबाबत लेखा व वित्त अधिकारी प्रदीप शेलार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले़ यावर चर्चा होऊन ही सेवा बंद न करता त्यात सुधारणा करण्याचे ठरले़ प्रशासनाने संकलित करातून ३५ कोटींचे उत्पन्न गृहीत धरले़ याविषयी दीप चव्हाण म्हणाले, मागील वर्षी संकलित करातून किती उत्पन्न मिळाले़ त्यावर प्रशासनाने १२ कोटी ३६ लाखांची वसूल झाली आहे, असे उत्तर वसुली विभागाने दिले़ जर १२ कोटीच वसूल होतात तर तर यावेळी ३५ कोटी होईल, हे गृहीत धरणे योग्य आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ वसुलीत मोठी तफावत असूनही अंदाजपत्रकात वसुलीचा आकडा फुगविण्यात आला़ काय आहे वादग्रस्त तरतूद महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत संकलित कर आहे़संकलित करातून मिळणार्‍या उत्पन्नावर महापालिकेचा डोलारा उभा असतो़ मागील वर्षी संकलित करातून ३५ कोटीपैकी १२ कोटी ३६ लाखांची वसुली झाली़ कराची १०० टक्के वसुली होत नाही,हे माहित असूनही प्रशासनाने पुढील अर्थिक वर्षात १०० टक्के वसूल होऊन महापालिकेला त्यातून ३५ कोटींचे उत्पन्न मिळेल,असा अंदाज अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे़ विकासावर परिणाम अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे उत्पन्न मिळेल,असे गृहीत धरून पुढील वर्षांत खर्च केला जातो़ मात्र उत्पन्न येत नाही़ त्यामुळे ठेकेदारांची देयके रखडतात़विकास कामे होत नाहीत़परिणामी नियोजन कोलमडते़ परवाना नसला तरी पाच हजार उत्पन्न श्वानांच्या परवान्यातून पाच हजाराचे उत्पन्न अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे़ या उत्पन्नावर आक्षेप घेत सदस्यांनी किती परवाने दिले, याची माहिती मागविली असता असा कोणताही परवाना दिला जात नाही, एवढेच नाही तर परवाना देण्याची सुविधाच नसल्याचे उघड झाले़ यामुळे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला.