शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे धरणामुळे पुराची शक्यता कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

अकोले : निळवंडे धरणाच्या निर्मितीमुळे प्रवरेला अचानक पूर येण्याची शक्यता धूसर आहे. म्हणून तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ...

अकोले : निळवंडे धरणाच्या निर्मितीमुळे प्रवरेला अचानक पूर येण्याची शक्यता धूसर आहे. म्हणून तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

निळवंडे धरण निर्मितीच्या पूर्वी तालुक्याने प्रवरा नदीचे पूर अनुभवले आहे. १९६८-६९ साली प्रवरेला पूर आला होता. तालुक्यातील रुंभोडी गावात पाणी शिरले होते. अकोलेतील मोठ्या पुलाला पाणी लागले होते. संगमनेर शहरात पाणी शिरले होते. त्यानंतर, अनेकदा प्रवरेचा पूर अकोलेकरांनी अनुभवले. प्रवरा नदीवर ८.३२ टीएमसीचे निळवंडे धरण साकारले. २००८ला धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून प्रवरेचा पूर तालुक्याने पाहिला नाही. रंधा, चितळवेढे, कळस येथे प्रवरेवर उंच पूल झाल्याने वाहतूक ठप्प होणे बंद झाले. भंडारदरा व निळवंडे मिळवून १९.३२ टीएमसी पाणी अडविले जात असल्याने अचानक पूर येण्याची शक्यता आता राहिली नाही.

सह्याद्रीच्या काळ्या पाषाण खडकावर तालुक्यातील गावे वसलेली असल्याने भूकंपाचा धोका कमी आहे. जमिनीला भेगा पडण्याचे, दरडी कोसळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

तालुक्यात १९१ गावे असून, मुळा खोऱ्यात १२ ते १५ हजार क्यूसेकने पाऊस पाण्याचा विसर्ग आल्यास थोड्या-फार प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. प्रवरा नदी पात्रातून ४९ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडला, तरच पूर परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती गेल्या १३ वर्षांत झालेली नाही. प्रवरा पट्ट्यात ४९ गावे पूररेषेत असून, त्यापैकी १६ गावे २५० लोकसंख्या पूरबाधित होऊ शकतात. तालुक्यात सरासरी ३३६ मिमी पाऊस पडतो. घाटघर, रतनवाडी येथे साडेतीन-चार हजार मिलीमीटर पाऊस होतो, पण काही पाणी कोकणात वाहून जाते.

...........

धोकादायक परिस्थिती नाही

आढळा खोरे बहुतांशी पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने, या भागात शक्यतो पूरपरिस्थिती निर्माण होत नाही. तालुक्यात सह्यादीच्या पर्वत रांगा असून, २०१६ मध्ये फोपसंडी येथे दरड कोसळली होती. २०१७ मध्ये अंबित येथे जमिनीला भेग पडली होती, मात्र, ती धोकादायक नव्हती, असा निर्वाळा भूगर्भ व खगोल शास्त्रज्ञांनी दिला आहे, तरीही तशी काही परिस्थिती निर्माण झाली, तर काही तासांतच शासकीय आश्रमशाळेमध्ये नागरिकांचे स्थलांतर करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.

............

भूकंप, जमिनीला भेगा पडण्याचे, दरडी कोसळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, तरीही अकोले तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज आहे.

- तहसीलदार मुकेश कांबळे