शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा जिल्हा परिषद गट, गणाच्या फेररचनेला वेग

By admin | Updated: September 21, 2016 00:29 IST

नेवासा : नेवासा नगरपंचायतीची अधिसूचना जारी झाल्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणाची फेररचना करण्यात वेग आला आहे


नेवासा : नेवासा नगरपंचायतीची अधिसूचना जारी झाल्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणाची फेररचना करण्यात वेग आला आहे. नेवासा जिल्हा परिषद गट तर भेंडा गटासाठी मुकिंदपूर गणाची निर्मिती प्राथमिक स्वरूपात तयार करण्यात आली आहे.
नेवासा तालुक्यात जिल्हा परिषदचे सात गट तर पंचायत समितीचे चौदा गण होते. नेवासा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने नेवासा गट व गण हे बरखास्त होवून त्याऐवजी भानसहिवरा गट व गण तयार झाला असून भेंडा बु।। गटात नव्याने मुकिंदपूर गण निर्माण करण्यात आला आहे.
नव्याने प्रस्तावित असलेल्या गट व गणाची फेररचना करताना चांदा गटात चांदा गण-चांदा, लोहारवाडी, राजेगांव, शिंगवेतुकाई, फत्तेपूर, वांजोळी, कौठा व मांडेगव्हाण या गावांचा समावेश असणार आहे.तर देडगाव गण- देडगाव, तेलकुडगांव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरा, देवसडे या भागाचा समावेश असेल. सोनई गटात, सोनईगण सोनई व शिंगणापूर हे दोन गावे समाविष्ट आहेत तर घोडेगाव गण - घोडेगाव, झापवाडी, मोरेचिंचोरे, लोहगांव, पानसवाडी, धनगरवाडी, वंजारवाडी ही गावे आहेत. खरवंडी गटात - खरवंडीगण - खरवंडी, हिंगोणी, कांगोणी, वडाळाबहिरोबा, बऱ्हाणपूर, रास्तापूर, म्हाळस पिंपळगाव तर करजगाव गण - करजगांव, गणेशवाडी, लांडेवाडी, बेल्हेकरवाडी, पानेगांव, तामसवाडी, शिरेगाव, अंमळनेर, खेडले परमानंद, वाटापूर या गावाचा समावेश आहे.
भानसहिवरा गट - भानसहिवरा गण - भानसहिवरा, माळी चिचोंरा, उस्थळ दुमाला, नविन चांदगाव, नारायणवाडी, हंडी निमगांव, सुरेशनगर, निपानी निमगांव ही गावे आहेत तर पाचेगाव गण - पाचेगाव, पुनतगाव, नेवासा बु।।, गोमळवाडी, चिचबन, खुपटी, लेकुरवाळी आखाडा, जायगुडे आखाडा, गोणेगांव, निंभारी या गावाचा समावेश असेल. भेंडा बुद्रुक गट - यात भेंडा बुद्रुक गण - भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, सौंदाळा, देवगांव, नजिक चिंचोली, शहापूर, दिघी ही गावे आहेत तर मुकिंदपूर गण - मुकिंदपूर, बाभूळखेडा, नागापूर, मक्तापूर, पिचडगांव, गोंडेगाव म्हसले, खुणेगांव, रांजणगांव, कारेगांव, खडका हे समाविष्ट करण्यात आले आहेत. कुकाणा गट - कुकाणागण कुकाणा, अंतरवाली, वडुले, चिलेखनवाडी, जेऊर, तरवडी, नांदुरशिकारी, सुलतानपूर, सुकळी खुर्द / बुद्रुक तर
शिरसगांव गण - शिरसगांव, गोपाळपूर, खामगांव, रामहोड, वाकडी, पिंप्रीशहाली, गेवराई, पाथरवाला, वरखेड या गावांचा समावेश असणार आहे. बेलपिंपळगांव गटात बेलपिंपळगांव गण - बेलपिंपळगांव, घोगरगांव, जैनपुर, बेलपांढरी, सुरेगांव गंगा, गोधेगाव, उस्थळखालसा, भालगांव, मुरमे, बकुपिंपळगांव, बहिरवाडी, तर सलाबतपूर गण - सलाबतपूर, जळके खुर्द, जळके बुद्रुक, गळनिंब, गिडेगाव, टोका, गोगलगांव, मंगळापूर, खेडले काजळी, प्रवरासंगम, माळेवाडी, म्हाळापूर गावाचा समावेश असणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)