'न्युरोसर्जन' सुजय वाढवणार आघाडीची डोकदु:खी, जाणून घ्या विखेंचा 'बायोडेटा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 16:40 IST2019-03-12T16:39:55+5:302019-03-12T16:40:49+5:30
सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सुजय यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

'न्युरोसर्जन' सुजय वाढवणार आघाडीची डोकदु:खी, जाणून घ्या विखेंचा 'बायोडेटा'
अहमदनगर - काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर, काही मिनिटांतच सुजय विखे यांच्या फेकबुक पेजवरील छायाचित्र बदलले आहे. देश सेवेसाठी... नगरच्या प्रगतीसाठी... उज्ज्वल भविष्यासाठी.. भाजपा असे लिहिलेले कमळाचे छायाचित्र विखे पाटील यांच्या फेसबुक पेजवर अपलोड झाले आहे. तर, न्युरोसर्जन असलेले डॉ. सुजय विखे पाटील, आता आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत.
सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सुजय यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगरमधील विखे-पाटलांची नवी पिढी आता भाजपात गेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटलांच्या भाजपा प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर आघाडीसाठी न्युरोसर्जन सुजय विखेपाटील हे डोकेदुखी ठरणार आहेत. अहमदनगरमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून येईल. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो, अहमदनगरमध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सुजय विखे-पाटलांनी यावेळी बोलतान म्हटलं.
सुजय पाटील हे उच्चशिक्षित असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी पदवी धारण केली आहे. ते न्युरो सर्जन आहेत. बेळगाव येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची पदवी पूर्ण केली आहे. तर पिंपरी येथी डी.वाय. पाटील महाविद्यालयातून त्यांनी न्यूरो सर्जरीचे शिक्षण घेतले.
डॉ. सुजय विखे पाटील यांचा बायोडेटा
डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन)
पदवी- वैद्यकीय, न्युरो सर्जन
जन्म- २१ नोव्हेंबर १९८२
शिक्षण- द डेली कॉलेज, इंदौर
एम.बी.बी.एस. - जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, बेळगाव
एम.एस. (जनरल सर्जरी)- प्रवरा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी
न्युरोसर्जरी- डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पिंपरी, पुणे
जून २०११- कार्यकारी संचालक- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल
एप्रिल २०१२-मुख्य कार्यकारी अधिकारी- डॉ. पद्मश्री विठ्ठलराल विखे पाटील मेडिकल फौंडेशन
नगर येथील विळद घाटात डॉ. पद्मश्री विखे पाटील फौंडेशनचे प्रमुख म्हणून त्यांनी विस्तार केला. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन, दंत वैद्यकीय अशा विविध शाखांचा विस्तार
सीबीएसई पॅटर्नची इंग्रजी शाळाही विळद घाटात सुरू केली
टोपण नाव- दादा