शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सलग आठ दिवस उभे राहून भक्तांची नवसपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:12 IST

शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावचे ग्रामदैवत जगदंबा मातेचा शारदीय नवरात्रौत्सव ‘खडी नवरात्र’ म्हणून ओळखला जातो. ही येथील जुनी परंपरा आहे. हे भाविक उपवास काळात रात्रंदिवस उभे राहतात. आधारसाठी केवळ काठी घेतात. अलीकडील काळात युवकही हे उपवास करू लागले आहेत. झोपण्यासाठी टांगलेला झोपाळा (चोफाळा) वापरला जातो.

नानासाहेब चेडे  ।  दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावचे ग्रामदैवत जगदंबा मातेचा शारदीय नवरात्रौत्सव ‘खडी नवरात्र’ म्हणून ओळखला जातो. ही येथील जुनी परंपरा आहे. हे भाविक उपवास काळात रात्रंदिवस उभे राहतात. आधारसाठी केवळ काठी घेतात. अलीकडील काळात युवकही हे उपवास करू लागले आहेत. झोपण्यासाठी टांगलेला झोपाळा (चोफाळा) वापरला जातो.घटस्थापनेपासून दसºयापर्यंत पंचाक्रोशीतील भाविक ‘खडी नवरात्रीचा उपवास करतात. उपवास करणारे भक्त आपले सर्व व्यवहार उभ्यानेच पार पडतात. आधार म्हणून हातात सतत काठी असते. झोपण्यासाठी टांगलेला झोपाळा (चोफाळा) वापरला जातो. एक पाय झोपाळ्यावर व एक पाय कायम जमिनीवर ठेवलेला असतो. ‘खडी नवरात्रा’चा हा उपवास ज्येष्ठांसह तरुणाईही मोठ्या संख्येने धरते. आठ दिवस देवीचा उपवास आणि एका दिवसाचा बालाजीचा उपवास ठेऊन दस-याच्या दिवशी उपवास सोडला जातो.राज्य शासनाच्या ‘क’ वर्ग देवस्थानात असणारे हे जगदंबा मातेचे मंदिर हेमाडपंथी आहे. सुमारे सातशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. मंदिर स्थापत्यकलेचा आदर्श नमुना व वास्तुकलेचा अनमोल असा ठेवा आहे. मंदिरामध्ये जगदंबा माता देवीचा भव्य तांदळा आहे. मंदिराला भव्य कळस असून त्यावर असणा-या देवतांच्या मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेतात. मंदिर आजही सुस्थितीत असून हिंदू संस्कृतीचे एक अनमोल असे भूषण आहे. मंदिरालगतच पुरातन बारव आहे. भाविनिमगावचा उल्लेख नवनाथ ग्रंथामध्ये भामानगर म्हणून केलेला आहे. राज्यभरात देवीच्या नावावरून या गावाची ‘देवीनिमगाव’ अशी ओळख आहे. राजमाता अहिल्यादेवींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, असे सांगितले जाते. कुणी या देवीला माहुरची रेणुका तर कुणी जगदंबा माता, भवानी, भोन्याई म्हणून संबोधतात.  शनिवारी सातव्या माळेला देवीचा भव्य यात्रौत्सव असून मंदिर व्यवस्थापनाने व ग्रामस्थांनी भाविकांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर