नागेश कदारे याला कांस्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:23+5:302021-09-08T04:26:23+5:30

संगमनेर : लोकपंचायत ग्रामीण तंत्रशिक्षण संस्थेच्या नागेश कदारे या विद्यार्थ्याने ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थे’तर्फे आयोजित ‘इंडिया स्किल्स २०२१’ ...

Nagesh Kadare won the bronze medal | नागेश कदारे याला कांस्य पदक

नागेश कदारे याला कांस्य पदक

संगमनेर : लोकपंचायत ग्रामीण तंत्रशिक्षण संस्थेच्या नागेश कदारे या विद्यार्थ्याने ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थे’तर्फे आयोजित ‘इंडिया स्किल्स २०२१’ या राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्य पदक मिळविले. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

स्पर्धेत जिल्हा व विभागीय स्तरावर निवड झालेले राज्यभरातील आयटीआय महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात लोकपंचायत ग्रामीण तंत्रशिक्षण संस्थेच्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय स्तरातून निवड झाली होती. त्यात कदारे याने सीएनसी मिलिंग ट्रेडसाठी कांस्य पदक मिळविले. संस्थेचे अध्यक्ष विजय थोरात, उपाध्यक्ष तुळशीराम जाधव, सचिव संजय फल्ले, खजिनदार जिल्हा परिषद सीताराम राऊत, कार्यकारी विश्वस्त सारंग पांडे आदींनी कदारे यांचे कौतुक केले. त्याला प्राचार्य प्रशांत सहाणे, शिक्षक विकास गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Nagesh Kadare won the bronze medal