महापालिका निवडणूक: नगर, धुळ्यात आज मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:49 IST2018-12-10T06:27:46+5:302018-12-10T06:49:42+5:30
त्रिशंकू स्थितीची शक्यता

महापालिका निवडणूक: नगर, धुळ्यात आज मतमोजणी
धुळे/अहमदनगर : महापालिका निवणुकीत रविवारी धुळ्यात ६० टक्के तर नगरमध्ये ७० टक्के मतदान झाले. दुपारनंतर दोन्ही ठिकाणी मतदानासाठी उशिरापर्यंत मोठ्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी दोन्ही ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन दुपारी बारानंतर निकाल हाती लागण्यास सुरुवात होईल. धुळ्यात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचा आरोप विविध पक्षांनी केला़ नगर व धुळ्यात त्रिशंकू स्थिती राहील, अशी शक्यता आहे.