शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका पोटनिवडणूक: पहिल्याच दिवशी २१ अर्जांची विक्री

By admin | Updated: December 15, 2015 23:13 IST

अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग ११ व १५ मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज वितरीत करण्याच्या पहिल्याच दिवशी २१ अर्जांची विक्री झाली.

अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग ११ व १५ मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज वितरीत करण्याच्या पहिल्याच दिवशी २१ अर्जांची विक्री झाली. प्रभाग ११ मध्ये इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारी देताना पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रभाग ११ मधील नगरसेवक अजिंक्य बोरकर अपात्र ठरल्यानंतर प्रभागात निवडणूक होत आहे. अशोक दहिफळे, योगीराज गाडे यांच्यात सेनेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही उमेदवारी अर्ज आज घेतले. भाजपकडून पक्षाच्या महिला पदाधिकारी संगीता खरमाळे यांचे चिरंजीव सुजित रत्नाकर खरमाळे यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. खरमाळे यांच्या अर्जामुळे भाजप-सेनेची युती होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच प्रभागात अपक्ष नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती कलावती शेळके यांचे चिरंजीव चंद्रकांत सूर्यभान शेळके यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. अपात्र ठरलेल्या बोरकर यांच्याच कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीत सुरू आहेत. प्रभाग १५ मध्ये सना सय्यद, जयश्री सुनील क्षेत्रे, कोमल नाना साबळे या तिघांनी ८ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. या प्रभागाच्या नगरसेविका अनिता भोसले या अपात्र ठरल्यामुळे या प्रभागाची पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती २२ डिसेंबरपर्यंत सुरू आहे. पहिल्याच दिवशी इच्छुकांनी अर्ज विकत घेण्यासाठी चढाओढ सुरू केल्याचे दिसून आले. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षाची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)