शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना विभागातील सहा मठाधिपती हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST

---------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महापालिकेतील नगरचना विभागात वर्षानुवर्षे एकाच टेबलावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला आयुक्त शंकर गोरे ...

----------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : महापालिकेतील नगरचना विभागात वर्षानुवर्षे एकाच टेबलावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला आयुक्त शंकर गोरे यांनी अखेर सुरुंग लावला. पहिल्याच दिवशी नगरचनामधील ६, तर अन्य विभागातील ५ अशा ११ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मनपा आयुक्त गोरे यांच्या घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

‘लोकमत’ने महापालिकेतील एकाधिकारशाही या मथळ्याखाली वर्षानुवर्षे एकाच टेबलावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा भांडाफोड करणारी पाच भागांची वृत्त मालिका प्रकाशित केली होती. या मालिकेवर प्रतिक्रिया देताना आयुक्त गोरे यांनी २० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार गोरे यांनी नगररचना विभागापासून सोमवारी बदल्यांना सुरुवात केली. नगररचनाचे सहायक संचालक राम चारठणकर यांच्यासह अधिकाऱ्यांची आयुक्तांनी बैठक घेतली. दुपारी सुरू झालेली ही बैठक सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती. आयुक्त गोरे यांनीही बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. नगररचना विभागातील सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करत तत्काळ हजर होण्याचा आदेश दिला आहे. तसेच झालेली बदली रद्द करण्याबाबत कुठलाही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास महापालिका अधिनियम कलम ५६ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गोरे यांनी दिला आहे. तसेच बदल्या करताना कामकाज ठप्प होणार नाही, याचीही काळजी घेण्यात येत असून, कामाच्या सोयीनुसार बदल्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेतील नगररचना बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, आस्थापना, यासह अन्य विभागातील कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच टेबलावर काम करत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत असून, नागरिकांनाही छोट्या छोट्या कामांसाठी महापालिकेत अक्षरश: हेलपाटे मारावे लागतात. ज्येष्ठ नागरिकांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही महापालिकेतील कर्मचाऱ्यांबाबतचा अनुभव वाईट आहे.

.........

नगररचनातील यांच्या झाल्या बदल्या

नगररचना विभागातील ट्रेसर सतीश दारकुंडे यांची नगररचना विभागातून बांधकाम विभागात बदली करण्यात आली आहे. लिपिक व टंकलेखक संजय चव्हाण यांची नगररचना विभागातून प्रभाग समिती क्रमांक- ४ मध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रभाग समिती क्रमांक चारमधील शिवराम गावांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिपिक सुनील खलचे यांची नगररचना विभागातून सावेडी प्रभाग कार्यालयात बदली करण्यात आली आहे. खलचे यांच्या जागी सावेडी प्रभाग कार्यालयातील देवराम पिचड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिपिक मोहन ढवळे यांची नगररचना विभागातून स्थानिक संस्था कर विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्थानिक संस्था कर विभागातील किशोर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिपिक राजेंद्र फडतारे यांची नगररचना विभागातून प्रभाग समिती क्रमांक- ३ मध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रभाग समिती क्रमांक-३ मधील राहुल झिंजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिपाई राधा आहेर यांची नगररचना विभागातून माहिती सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माहिती सुविधा केंद्रातील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या उज्ज्वला महारपुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

...........

सर्व विभागांचा आढावा घेऊन कामाच्या सोयीनुसार बदल्या

महापालिकेतील वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. सोमवारी नगररचना विभागातील कामकाजाचा आढावा घेऊन सहा कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागांत बदल्या करण्यात आल्या आहेत. अन्य बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, आस्थापना, सामान्य प्रशासन आदी विभागांचा आढावा घेऊन कामाच्या सोयीनुसार बदल्या करण्यात येणार आहेत. बदल्या करताना कामकाज ठप्प होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.

- शंकर गोरे, आयुक्त, महापालिका

....