शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मनसे नगरसेवकांचे निलंबन मागे?

By admin | Updated: December 15, 2015 23:14 IST

अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या मनसेच्या तिघा नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या

अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या मनसेच्या तिघा नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून पुणे येथे राज ठाकरे यांच्यासोबत आज बुधवारी होणाऱ्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीतच नगर शहर संघटनेत फेरबदल होतील, असा दावा नगरसेवकांकडून केला जात आहे. नगर शहरात किशोर डागवाले, गणेश भोसले, वीणा बोज्जा, सुवर्णा जाधव हे मनसेचे चार नगरसेवक आहेत. त्यातील किशोर डागवाले यांनी सेनेत प्रवेश केला आहे. उर्वरित तिघांचाही सेनेत प्रवेश होईल, असे सूतोवाच डागवाले यांनी केल्यानंतर लगेचच मनसेत हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाने सेनेचे उमेदवार सचिन जाधव यांना मतदान करण्याचा पक्षादेश बजावला होता. मात्र, तो झुगारून मनसेच्या चारही नगरसेवकांनी आघाडीचे अभिषेक कळमकर यांना मतदान केले. कळमकर पुढे महापौर झाले. मात्र पक्षादेश झुगारल्याच्या कारणावरून मनसेच्या चारही नगरसेवकांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन करण्यात आले. आता डागवाले यांनी सेनेत प्रवेश करताच अन्य तिघांचे निलंबन मागे घेण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी अविनाश अभ्यंकर यांनी तसा निरोप नगरसेवकांना दिला असून पुण्यात बुधवारी भेटीसाठी बोलविण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यासोबत हे तिन्ही नगरसेवक संवाद साधणार आहेत. दरम्यान, पक्ष संघटनेतही बदल होणार असल्याच्या वृत्ताने पदाधिकारीही संभ्रमीत झाले आहेत. नगरसेवक एका बाजुला अन् पक्षाचे पदाधिकारी दुसऱ्या बाजुला अशी पक्षाची शहरात परिस्थिती आहे. त्यामुळे पुण्यात राज ठाकरे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)