शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मिरजगावला पावसाने झोडपले

By admin | Updated: September 4, 2024 14:22 IST

मिरजगाव : कर्जत तालुक्यातील मिरजगावला मंगळवारी सायंकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले.

मिरजगाव : कर्जत तालुक्यातील मिरजगावला मंगळवारी सायंकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तब्बल दहा वर्षानंतर नद्या, नाले वाहते झाल्याने नगर-सोलापूर महामार्ग सुमारे दोन तास ठप्प झाला होता. एका वाहनाने दिलेल्या धडकेने एका जणाला जीव गमवावा लागला.मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मिरजगावसह परिसरात सुमारे तीन तास हा पाऊस झाला. या पावसाची नोंद १३६ मि.मी. इतकी झाली आहे. मिरजगावच्या इतिहासात हा विक्रमी पाऊस समजला जातो. नद्या, नाल्यांना पाणी आल्याने सखल भागात पाणी साचले होते. काही घरांमध्यहीे पाणी शिरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. छोटे पूल, रस्ते पावसाने वाहून गेले. नगर-सोलापूर महामार्गावरील डुकरी नदीवरील पुलापर्यंत पाणी आले होते. शेतांना तळ्याचे स्वरुप आले होते. नगर-सोलापूर महामार्गावरील कोकणगावनजीकच्या वागजाई नदीला पूर आल्याने सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. नदीनजीक उभा असलेला ट्रक चालक महंमद मकदूम अब्दूल बलकोनी (वय ३०, रा. बसवाकल्याण जि.बिदर) भरधाव वेगाने आलेल्या पीकअप व्हॅनने (क्र. एम.एच.१६-क्यू ६६३१) जोराची धडक दिल्याने जागीच ठार झाला. घटनेनंतर ही पीकअप व्हॅन रस्त्याच्या कडेला नाल्यात जाऊन उलटली. नदीतील पुरातून पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन मोटारसायकली वाहून गेल्या. परंतु यामध्ये जीवितहानी झाली नाही. (वार्ताहर)