शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांनी बदल्यातील पैशातून एखादे कोविड सेंटर उभारावे; खासदार विखे यांचा मंत्री थोरात यांना टोला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 13:09 IST

श्रीगोंदा :  मंत्री कोरोनाच्या आढावा बैठका घेऊन ऑक्सिजन, रेमडीसिवरचा आढावा घेतात पण कार्यवाही शुन्य आहे. त्यापेक्षा बदल्यात कमविलेल्या पैशातून कोविड सेंटर सुरु करावेत. शासनाच्या पैशातून सुरु असलेल्या कोविड सेंटरवर पाट्या लावू नयेत, असा टोला खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसुल मंत्रीबाळासाहेब थोरात यांचे नाव थोरातांना लगावला आहे.


श्रीगोंदा :  मंत्री कोरोनाच्या आढावा बैठका घेऊन ऑक्सिजन, रेमडीसिवरचा आढावा घेतात पण कार्यवाही शुन्य आहे. त्यापेक्षा बदल्यात कमविलेल्या पैशातून कोविड सेंटर सुरु करावेत. शासनाच्या पैशातून सुरु असलेल्या कोविड सेंटरवर पाट्या लावू नयेत, असा टोला खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसुल मंत्रीबाळासाहेब थोरात यांचे नाव थोरातांना लगावला आहे.

विखे यांनी कोळगाव पिंपळगाव पिसा, घारगाव, लोणीव्यंकनाथ मढेवडगाव, कोविड सेंटरला काष्टी येथील ऑक्सिजन प्रकल्पास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. विखे लोकसहभागातून सुरु असलेल्या सर्व कोविड सेंटरला प्रत्येकी 50  हजाराची मदत केली.

सुजय विखे पुढे म्हणाले की,  श्रीगोंदा तालुक्यातील गावगावच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून कोविड सेंटर सुरु केले ही आनंदाची बाब आहे.  इतर तालुक्यात अशी कोविड सेंटर सुरु झाली तर शहरात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचा लोंढा थांबेल.  


बाळासाहेब नाहाटा व त्यांच्या सहकाऱ्यांनी  तर या कामात स्वत:ला वाहून घेतले. या काळात जे कार्यकर्ते मदत करत त्यांना समाज कधीच विसरणार नाही.  बाळासाहेब नाहाटा तुम्ही आणखी वेगाने काम करा आणखी मदत करीन, असेही विखे म्हणाले.

 

भाजपकडे रेमडीसिवर इंजेक्शन कोठून आली? 

सुजय विखे म्हणाले की रेमडीसिवर इंजेक्शनशी  भाजपाचा कोणताही संबंध नाही. विखे पाटील घराण्याचे काही उद्योगपतीशी संबध आहेत. आमच्या काॅलेजमध्ये शिकून काहींनी कंपन्या टाकल्या. त्यामुळे विमानाने दोन हजार रेमडीसिवर इंजेक्शन आणली आणि रुग्णांना दिली.  डाॅक्टरांनी गरज असेल तरच रेमडीसिवर इंजेक्शन द्यावे. विनाकारण रेमडीसिवर इंजेक्शन देऊ नये. 

यावेळी आमदार बबनराव पाचपुते,  माजी राहुल जगताप, भैय्या लगड,  हेमंत नलगे, डाॅ. चंद्रशेखर कळमकर,  प्रविण मुनोत, मनेश पाटील,  विजय नलगे, लालासाहेब काकडे, रमेश खोमणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या