शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

भाळवणीच्या कोविड सेंटरचा जनसामान्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST

पारनेर : सलग दुसऱ्या वर्षी देशासह राज्यात कोरोनाची लाट आलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही आताची परिस्थिती गंभीर आहे. या ...

पारनेर : सलग दुसऱ्या वर्षी देशासह राज्यात कोरोनाची लाट आलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही आताची परिस्थिती गंभीर आहे. या अस्मानी संकटात आमदार निलेश लंके यांनी भाळवणीत एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारून जनसामान्यांना आधार दिला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

भाळवणी (ता. पारनेर) येथे सुरू केलेल्या एक हजार बेडच्या कोविड सेंटरचे लोकार्पण जिल्हाधिकारी भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचा हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

लंके म्हणाले, मागच्या वर्षीची परिस्थिती व आजची परिस्थिती भयंकर आहे. दिवसेंदिवस कोरोना परिस्थिती गंभीर होत चालली असून ऑक्सिजन, रेमडेसिविर, बेडचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे थोडी फार जरी लक्षणे आढळली तर नागरिकांनी तपासणी केली तर घरच्या घरीच या आजारातून बरे होता येईल. प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबात काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कोविड सेंटरसाठी मोफत मंगल कार्यालय उपलब्ध करून देणाऱ्या भुजबळ कुटुंबीयांचेही लंके यांनी कौतुक केले.

यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, अशोक सावंत, सरपंच राहुल झावरे, दीपक लंके, संभाजी रोहोकले, सुरेश धुरपते, बबन भुजबळ, संतोष भुजबळ, बबलू रोहोकले, जितेश‌ सरडे, डॉ. आव्हाड, बाळासाहेब खिलारी, जयसिंग मापारी, दत्ता आवारी, सैनिक बँक अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे, सचिन पठारे‌, दत्ताभाऊ कोरडे, अभय नांगरे, गणेश कावरे, डॉ. बाळासाहेब कावरे, उदय बर्वे, डॉ. लोंढे, रायभान औटी आदी उपस्थित होते.

--

१५ भाळवणी कोविड

भाळवणी येथील कोविड सेंटरचे लोकार्पण करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, आमदार निलेश लंके ,तहसीलदार ज्योती देवरे, प्रा. बबन भुजबळ, सरपंच राहुल झावरे, बबलू रोहोकले, डॉ बाळासाहेब कावरे, अभयसिंह नागरे व इतर.