भाळवणीच्या कोविड सेंटरचा जनसामान्यांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:36+5:302021-04-16T04:20:36+5:30
पारनेर : सलग दुसऱ्या वर्षी देशासह राज्यात कोरोनाची लाट आलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही आताची परिस्थिती गंभीर आहे. या ...

भाळवणीच्या कोविड सेंटरचा जनसामान्यांना आधार
पारनेर : सलग दुसऱ्या वर्षी देशासह राज्यात कोरोनाची लाट आलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही आताची परिस्थिती गंभीर आहे. या अस्मानी संकटात आमदार निलेश लंके यांनी भाळवणीत एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारून जनसामान्यांना आधार दिला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
भाळवणी (ता. पारनेर) येथे सुरू केलेल्या एक हजार बेडच्या कोविड सेंटरचे लोकार्पण जिल्हाधिकारी भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचा हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
लंके म्हणाले, मागच्या वर्षीची परिस्थिती व आजची परिस्थिती भयंकर आहे. दिवसेंदिवस कोरोना परिस्थिती गंभीर होत चालली असून ऑक्सिजन, रेमडेसिविर, बेडचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे थोडी फार जरी लक्षणे आढळली तर नागरिकांनी तपासणी केली तर घरच्या घरीच या आजारातून बरे होता येईल. प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबात काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कोविड सेंटरसाठी मोफत मंगल कार्यालय उपलब्ध करून देणाऱ्या भुजबळ कुटुंबीयांचेही लंके यांनी कौतुक केले.
यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, अशोक सावंत, सरपंच राहुल झावरे, दीपक लंके, संभाजी रोहोकले, सुरेश धुरपते, बबन भुजबळ, संतोष भुजबळ, बबलू रोहोकले, जितेश सरडे, डॉ. आव्हाड, बाळासाहेब खिलारी, जयसिंग मापारी, दत्ता आवारी, सैनिक बँक अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे, सचिन पठारे, दत्ताभाऊ कोरडे, अभय नांगरे, गणेश कावरे, डॉ. बाळासाहेब कावरे, उदय बर्वे, डॉ. लोंढे, रायभान औटी आदी उपस्थित होते.
--
१५ भाळवणी कोविड
भाळवणी येथील कोविड सेंटरचे लोकार्पण करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, आमदार निलेश लंके ,तहसीलदार ज्योती देवरे, प्रा. बबन भुजबळ, सरपंच राहुल झावरे, बबलू रोहोकले, डॉ बाळासाहेब कावरे, अभयसिंह नागरे व इतर.