शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

जलयुक्त अभियानातून गावे जलस्वयंपूर्ण करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

By साहेबराव नरसाळे | Updated: July 13, 2023 19:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन, जलशक्ती अभियान व अमृत सरोवर या योजनांची आढावा बैठक झाली.

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळून पीक उत्पादन वाढीसाठी जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावी. या योजनेच्या माध्यमातून गावे जलस्वयंपूर्ण करण्याबरोबरच निवडलेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.  

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन, जलशक्ती अभियान व अमृत सरोवर या योजनांची आढावा बैठक झाली. बैठकीत जलशक्ती अभियानाच्या माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. बैठकीला समितीचे सदस्य पद्मश्री पोपटराव पवार, उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून गावे जलस्वयंपूर्ण करण्याबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या बाबींना प्राधान्य देण्यात यावे. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आहेत. या सर्व योजना या गावांमध्ये राबविण्यात येऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा. गावामध्ये फेरफारची प्रलंबितता, शेतरस्ते मोकळे करणे, गावांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी सोलारचा वापर, प्रत्येक गाव कचरामुक्त व हागणदारीमुक्त करणे यासह इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून निसर्गपुरक गावे निर्माणावर अधिक भर द्यावा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

१६६ ठिकाणी अमृत सरोवरची कामे

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अमृत सरोवर व जलशक्ती अभियानाचाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प प्राधान्याने राबविण्यात यावा. जिल्ह्यात ११६ ठिकाणी अमृत सरोवरची कामे सुरु असून ही कामे गुणवत्तापूर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.विकासात्मक धोरणामध्ये जिल्ह्याचा मोलाचा वाटा - पद्मश्री पोपटराव पवार

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, जलसंधारणांच्या कामांमध्ये नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याची गरज असुन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये एनएसएस व एनसीसी विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा ठरेल. योजनेसाठी निधीची कमतरता नसून कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्याची आवश्यकता आहे.257 गावांमध्ये जलसंधारणाची कामे गतीने करा

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील 257 गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे गतीने करण्याबरोबरच कामासंदर्भात असलेल्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात याव्यात. जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन बाबतची माहिती गावामध्ये होणाऱ्या ग्रामसभांमधुन प्रत्येक गावकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केल्या.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार