शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; शिर्डी मतदारसंघात व्हिडिओ व्हायरल

By शिवाजी पवार | Updated: May 13, 2024 14:39 IST

पोहेगाव केंद्रावर महाआघाडीच्या उमेदवारांचा आक्षेप

 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदानावेळी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे महायुतीच्या उमेदवारांच्या स्लिप मतदान केंद्रात मिळून आल्या. त्यास विरोधी महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आक्षेप घेत निवडणूक कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे मतदान केंद्रावर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 

शिर्डीत महायुतीचे सदाशिव लोखंडे, महाआघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्यात लढत होत आहे. सोमवारी सकाळपासूनच तीनही उमेदवार मतदारसंघातील केंद्रांना भेट देत होते. दुपारी एक वाजेच्या दरम्यान भाऊसाहेब वाकचौरे हे पोहेगाव येथील मतदान केंद्रावर समर्थकांसह दाखल झाले. त्यावेळी प्रत्यक्ष मतदान केंद्रात महायुतीचे लोखंडे यांच्या नावाच्या स्लिपचे वितरण केले जात होते, असे वाकचौरे यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने यंदा घरोघर बीएलओ मार्फत स्लिप वितरित केल्या होत्या. त्यामुळे उमेदवारांच्या नावाने थेट मतदान केंद्रात स्लिप दिल्या जात असेल तर हा गंभीर प्रकार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांनी  निष्पक्ष काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा प्रकार ताबडतोब थांबवावा, अशी मागणी वाकचौरे यांनी केली. तसा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाकचौरे यांच्या समर्थकांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवर मोठा रोष व्यक्त केला.