शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 14:27 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात लढत होत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होत आहे,पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाचे काशिनाथ दाते निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, या मतदारसंघात आज मोठी घडामोड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेतच काशिनाथ दाते यांना लंके यांचे कट्टर विरोधक विजय औटी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं

यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.  आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पारनेरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेवेळी लंके यांचे कट्टर विरोधक विजय औटी यांनी काशिनाथ दाते यांना पाठिंबा दिला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पारनेर तालुक्यात आल्यावर माझ्या आजोळी आल्यासारखं वाटतं. अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय पार्श्वभूमी मला माहीत आहे. पारनेरच्या जागेबाबत महायुतीतील इतरही पक्षाने मागणी केली होती. मागे एकदा बबनराव पाचपुते यांनी जसं जसं वेगळी वाट धरली, तेव्हा पाच-सहा विरोधकांना एकत्र केलं होतं. तसंच पारनेरमधील पाच ते सहा जणांना एकत्रित करुन उमेदवारी देण्यात आली आहे. जे काशिनात दाते यांच्यासोबत आले आहेत, त्यांचा योग्यवेळी योग्य सन्मान केला जाईल, असंही अजित पवार म्हणाले. 

 अजित पवार म्हणाले, मागासवर्ग समाजाच्या डोक्यामध्ये यांवी संविधान बदलणार असं टाकलं. चुकीचा फेक नेरेटीव्ह काँग्रेसने सेट केला. 'अब की बार 400 पार' करुन संविधान बदलायचे असा संदेश त्यांनी दिला. वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला होता. संविधान चांगले आहे, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत कोणही संविधानाला हात लावू शकत नाही, असंही अजित पवार म्हणाले. आज आम्ही सर्व जिल्ह्यात संविधान भवन बांधत आहेत, कुणीही गैरसमज करुन घेण्याची गरज नाही. किरकोळ दुरुस्ती असेल तर तो निर्णय पार्लमेंट घेत असतं, असंही अजित पवार म्हणाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या सभेवेळी पारनेर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काशिनाथ दाते यांना पाठिंबा दिला. औटी हे निलेश लंके यांचे कट्टर विरोधक आहेत. लंके यांच्याविरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्यामुळे मोठी चुरस होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parner-acपारनेरnilesh lankeनिलेश लंकेAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूक 2024big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४