शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 23:49 IST

अकोले नाका परिसरात लावण्यात आलेले विखे यांचे फलक फाडण्यात आले आहेत. विखे समर्थकांच्या काही वाहनांचीही तोडफोड झाली आहे

संगमनेर : धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात विखे समर्थक असलेले वसंतराव देशमुख यांनी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

विखे यांच्या भाषणापूर्वी देशमुख यांनी हे वक्तव्य केले. सभेनंतर धांदरफळ येथे महिलांनी देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला. महिला व्यासपीठावर गेल्या. तेथे महिलांनी ठिय्या मांडला आहे. देशमुख यांना येथे बोलवावे. त्यांचेवर कारवाई करावी त्याशिवाय आम्ही हटणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला आहे. सरपंच उज्ज्वला देशमाने यांसह अनेक महिला या आंदोलनात सहभागी आहेत.

अकोले नाका परिसरात लावण्यात आलेले विखे यांचे फलक फाडण्यात आले आहेत. विखे समर्थकांच्या काही वाहनांचीही तोडफोड झाली आहे. तालुका पोलीस स्टेशनला डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजित थोरात, अमर कतारी, सीताराम राऊत आदींसह रात्री उशिरा मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. सुजय विखे, वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान,  भर सभेत आमच्या बहिणीवर शिंतोडे, प्रचाराला बाहेर कशी पडते ते पाहू अशी धमकी,  लाडकी बहीण म्हणून मतांसाठी खोटे कौतुक आणि थेट जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या थराची भाषा, भाजपाचे हे ढोंग जनतेला स्पष्ट दिसतंय अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली.

या लोकांना जागा दाखवण्याची वेळ आलीय - सत्यजित तांबे

सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे. आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे. ह्याच वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची. बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच अशी संतप्त भूमिका आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sujay Vikheसुजय विखेsangamner-acसंगमनेरnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकBJPभाजपाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस