काळ्या पैशावर करडी नजर
By Admin | Updated: September 19, 2014 23:38 IST2014-09-19T23:17:21+5:302014-09-19T23:38:22+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कम्युनिकेशन प्लॅन आखला आहे.

काळ्या पैशावर करडी नजर
श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कम्युनिकेशन प्लॅन आखला आहे. काळा पैसा रोखण्यासाठी नाकेबंदी आणि उमेदवाराच्या बँक अकाऊंटमधील ट्रांझेक्शनवर करडी नजर ठेवणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.एच. सैदाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आचारसंहितेचे पालन होते की नाही यासाठी इन कॅमेरा नजर ठेवण्यासाठी तीन भरारी पथके, तीन कॅमेरा, तीन नाकाबंदी पथके तयार करण्यात आली आहेत. एका उमेदवारास खर्च मर्यादा २८ लाख आहे. उमेदवार निवडणूक प्रचार काळात किती पैसे काढतो यावर नियंत्रण ठेवणे संदर्भात बँक शाखाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बाहेरून काळा पैसा मतदारसंघात येऊ नये म्हणून मतदारसंघाच्या बॉर्डरलाईन वरील मुख्य रस्त्यावर नाकेबंदी करण्यात येणार आहे. नाकेबंदी करणाऱ्या पथकांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. उमेदवारांनी परवानाधारक वाहनांमधून प्रचार करणे आवश्यक आहे.
विना परवाना वाहनावर निवडणूक चिन्ह, बॅनर, पोस्टर्स आढळले तर संबंधित वाहन निवडणूक काळात जप्त करण्यात येईल.
शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रचारात भाग घेतल्यास व्हिडिओ क्लीपच्या आधारे तातडीने कारवाई करण्यात येईल, असे सैदाणे म्हणाले. यावेळी तहसीलदार डॉ.विनोद भामरे उपस्थित होते. (तालुुका प्रतिनिधी)