शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात वाढली गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST

राज्यात २०२० या वर्षात नगर जिल्हा गुन्हेगारीत अव्वल ठरला होता. गुन्ह्यांचे वर्गीकरण करून दाखल असलेल्या गुन्हेगारीची आकडेवारी नुकतीच सादर ...

राज्यात २०२० या वर्षात नगर जिल्हा गुन्हेगारीत अव्वल ठरला होता. गुन्ह्यांचे वर्गीकरण करून दाखल असलेल्या गुन्हेगारीची आकडेवारी नुकतीच सादर झाली होती. त्यात जिल्ह्यात तब्बल ३८ हजार ८१६ गुन्ह्यांची नोंद आढळून आली होती. जिल्ह्यात ३ हजार २०० कर्मचारी नेमणुकीस असून ३० पोलीस ठाणे कार्यरत आहेत. मात्र ही सर्व यंत्रणा गुन्हेगारी रोखण्यास तोकडी पडत आहे.

कोविड संकटामुळे भुरट्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किराणा मालाची दुकाने लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. जबरी चोरीच्या घटना कमी झाल्या असल्या तरी हाताला काम नसल्याने काही प्रवृत्ती चुकीच्या मार्गाला वळल्या आहेत.

------------

वाढीव पोलीस बळाचे काय?

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी नगर जिल्ह्यासाठी ५०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र गृह विभागाकडून त्यावर काय कार्यवाही झाली हे मात्र समजू शकलेले नाही.

------------

किरकोळ वादाचे प्रकार वाढले

कोविडमुळे बाहेरगावावरून गावी आलेल्या लोकांचे त्यांच्या कुटुंबीयांशी किरकोळ कारणांवरून वाद वाढले आहेत. रिकाम्या वेळातून अशा प्रकारच्या घटना होत आहेत. घराच्या अंगणात समोरासमोर आले तरी भांडणे होण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत.

- डॉ. दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर

----------

खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार

जिल्ह्यातील पोलीस दलात खबऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. तपासालाही मर्यादा आल्या आहेत. पुढील काळात खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार आहे.

----------

लॉकडाऊनमुळे ज्या लोकांसमोर जगण्याचेच आव्हान उभे राहिले आहे, अशा लोकांमध्ये नैतिक मूल्य रुजविण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. मात्र त्यांना समुपदेशन करून उपयोग नाही. कारण पैशांविना ते जगणार कसे? हा मुख्य प्रश्न आहे.

- डॉ. विक्रांत खैरनार, मानसोपचारतज्ज्ञ, श्रीरामपूर

------------