शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरमध्ये पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या पडला विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 15:54 IST

आंबी दुमाला येथे पशुवैद्यकीय संपत इथापे यांचे डाळिंबाचे शेत आहे.

घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

आंबी दुमाला येथे पशुवैद्यकीय संपत इथापे यांचे डाळिंबाचे शेत आहे. तेथूनच एक ओढा वाहत असून ओढ्यालगत त्यांच्या मालकीची विहीर आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या पाण्याच्या शोधात या परिसरात आला असता विहरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ओढ्यालागत बबन ढेरंगे हे गायी चारत होते. त्यांना विहिरीतून गुरगुल्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीतील आतल्या बाजूला कठड्यावर बिबट्या दिसला त्यांनी त्वरित ही माहिती डाळिंबात काम करणाऱ्या गेनुभाऊ नरवडे यांना दिली त्यांनी जमिनीचे मालक इथापे यांना सांगितले. इथापे यांनी घटनेची माहिती वनविभागास दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

नागरिकांनीही येथे नागरिकांची मोठी गर्दी केली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. त्यानंतरही बऱ्याच वेळानंतर हा बिबट्या पिंजऱ्यात आला. बिबट्या पिंजऱ्यात आल्याचे दिसताच पिंजरा क्रेन च्या मदतीने अलगदपणे बाहेर काढण्यात आला. या बिबट्यास सध्या वनविभागाच्या चंदनापुरी येथील नर्सरीत ठेवण्यात आले आहे. हा बिबट्या नऊ महिन्यांचा होता असे सांगण्यात आले.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात मानवीवस्तीतील बिबट्यांचा वावर वाढला आहे. अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे व अन्य प्राणी मानवीवस्तीत येत आहेत. या प्राण्यांकडून पाळीव प्राण्यांसह माणसांवरही हल्ले होत आहेत. पिकांचेही नुकसान होत आहे. ज्या ठिकाणी बिबट्या दिसेल तेथे वनविभागाकडून पिंजरे लावले जात आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याAhmednagarअहमदनगर