अहमदनगर महाविद्यालयात प्लाझ्मा दान विषयावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:53+5:302021-05-15T04:19:53+5:30

जनकल्याण रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी सोनाली खंदारे यांनी प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन केले. गुगल-मीटद्वारे ऑनलाइन हे व्याख्यान घेण्यात आले. या ...

Lecture on Plasma Donation at Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात प्लाझ्मा दान विषयावर व्याख्यान

अहमदनगर महाविद्यालयात प्लाझ्मा दान विषयावर व्याख्यान

जनकल्याण रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी सोनाली खंदारे यांनी प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन केले. गुगल-मीटद्वारे ऑनलाइन हे व्याख्यान घेण्यात आले. या उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. रझाक सय्यद यांचे नियोजन आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस यांचे मार्गदर्शन लाभले.

खंदारे यांनी प्लाझ्मा डोनेशनचा अर्थ, प्लाझ्मा उपचार पद्धतीचे स्वरूप, या उपचाराची आजच्या काळात गरज, प्लाझ्मा-दाता कोण बनू शकतो, नागरिकत्वाची जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्लाझ्मा-डोनेशन विषयक असलेले समज-गैरसमज यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी प्रा. रूपाली कुलकर्णी, प्रा. सारिका कुलकर्णी, प्रा. शीतल आवटे, प्रा. हिरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद नागवडे, डॉ. रझाक सय्यद, डॉ. बाळासाहेब गायकर, रजिस्ट्रार दीपक अल्हाट तसेच समन्वयक डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांचा सहयोग लाभला.

Web Title: Lecture on Plasma Donation at Ahmednagar College