शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
4
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
5
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
6
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
7
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
8
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
9
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
10
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
11
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
12
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
13
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
14
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
15
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
16
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
17
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
18
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
19
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
20
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती स्टेडियमवर लाखो मावळे

By admin | Updated: September 24, 2016 00:11 IST

अहमदनगर : सकाळच्या पहिल्या प्रहरीच मराठा मावळ्यांचे जत्थेच्या -जत्थे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम (वाडियापार्क) मैदानावर दाखल होत होते़

अहमदनगर : सकाळच्या पहिल्या प्रहरीच मराठा मावळ्यांचे जत्थेच्या -जत्थे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम (वाडियापार्क) मैदानावर दाखल होत होते़ एका रांगेत आणि कोणतीही घोषणा न देता आलेल्या मोर्चकऱ्यांनी भिंतीवरील पायऱ्यांवर बसकन मांडले़ काही वेळानंतर तिथेही पाय ठेवायला जागा राहिली नाही़ रात्री पाऊस होऊन गेल्याने मैदानात चिखल झाला होता़ त्याची तमा न बाळगता मोर्चेकरी हातात उंच भगवे झेंडे घेवून चिखलात उभे राहिले़ हजारो मराठ्यांचा असलेला हा नि:शब्द हुंकार पाहता पाहता लाखोंच्या घरात पोहोचला़ जिकडे नजर टाकावी, तिकडे भगवे व काळे झेंडे़ मैदानावर जणू काही भगवा सागरच उसळला असल्याचे चित्र शुक्रवारी वाडियापार्क मैदानावर पाहायला मिळाले़
मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून गुरुवारी रात्रीच मराठा समाज बांधव शहरात दाखल झाले होते़ स्टेडियममध्ये मोर्चेकऱ्यांची सकाळपासूनच रीघ लागली होती़ विशेष म्हणजे मोर्चात कोणतीही घोषणा दिली जात नव्हती़ एकाही नेत्याचे नेतृत्व नाही़ नेतृत्व नसलेले मोर्चेकरी रांगेने येऊन मैदानाच्या पायऱ्यांवर बसले़ सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही हजार मराठे मैदानावर दाखल झाले होते़ ही संख्या दहा वाजेनंतर वाढत गेली़
मैदानात स्वयंसेवकांनी लांबपर्यंत मानवी साखळी केली होती़ महिला व तरुणी उजव्या बाजूला बसल्या होत्या़ हातात काळे व भगवे झेंडे घेवून तरुणी मोर्चात सहभागी होण्यासाठी जमल्या होत्या़ शाळकरी मुलींचाही यात सहभाग होता़ मैदानातील गर्दी वाढून दहा वाजता मैदान मोर्चेकऱ्यांनी भरून गेले़ सर्वत्र काळे व भगवे झेंडे दिसत होते़ रात्री नगर शहरात पाऊस झाला होता़ त्यामुळे मैदानात कमालीचा चिखल होता़
मोर्चेकरी चिखलात हातात झेंडे घेवून उभे राहिले़ अकरा वाजेनंतर गर्दी अजूनच वाढली़ मैदानात पाय ठेवायला जागा उरली नाही़ मोर्चेकऱ्यांना प्रवेशव्दारावर पाण्याचे पाऊचचे वाटप करण्यात आले़ नियोजित वेळेप्रमाणे मोर्चेकऱ्यांना बाहेर सोडण्य्ाांत आले़ स्वयंसेवकांनी मानवी साखळी तयार करून महिलांना मार्ग मोकळा करून दिला़ अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने महिला व युवती मोर्चास्थळाकडे रवाना झाल्या़
काळ्या साड्या परिधान केलेल्या लाखो महिला मोर्चास्थानाकडे रवाना झाल्या़ कोपर्डीची घटना नगर जिल्ह्यातील असल्याने पीडित मुलीच्या वडिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते़ उपंस्थित मोर्चेकऱ्यांना संयोजकांकडून सूचना देण्यात येत होत्या़ या सूचनांचे पालन करत मोर्चेकऱ्यांनी शिस्तीचे दर्शन घडविले़
नेटवर्क गायब
मैदानावर लाखो मोर्चेकरी एकत्र आले़ फोटो घेवून ते गु्रपवर टाकले जात होते़ मात्र मोबाईलला नेटवर्क मिळत नव्हते़ उंचावर जावूनही नेटवर्क मिळत नसल्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला़
महिलांचा सहभाग लक्षणीय
मराठा क्रांती महा मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने महिला शहरात सकाळीच दाखल झाल्या़ वाडियापार्क येथे महिला मोठ्या संख्येने जमल्या़ महिला व युवतींनी हातात काळे व भगवे झेंडे घेतले होते़ काहींनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला़ महिला लोकप्रतिनिधींसह विविध संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांचीही संख्या मोठी होती़ चिमुकल्यांसह माता भगिनी मोर्चात सहभागी झाल्या होत्या़ महिलांचा सहभाग लक्षणीय होता़
पाण्याचे पाऊच
४मोर्चेकऱ्यांना पाण्याचे पाऊचचे वाटप करण्यात आले़ मोर्चेकरी भल्या पहाटेच शहरात दाखल झाले होते़ पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी सोय करण्यात आली होती़ तसेच संयोजन समितीने पाण्याचे पाऊचचे वाटप केले़ जागेवरच पाणी मिळाल्याने मोर्चेकऱ्यांनी समाधान व्यक्त केले़
मोर्चेकऱ्यांसोबत सेल्फी
४मोर्चेकऱ्यांच्या हाती असलेल्या भगव्या झेंड्यांमुळे मैदान भगवेमय झाले होते़ उंच झेंडे घेवून मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांसोबत सेल्फी घेण्याची धावपळ सुरू होती़ काहींनी उंच भगवे झेंडे हातात घेवून सेल्फी घेतले व व्हॉटसअप ग्रुपवर सेंन्ड केले़ हे फोटो हजारो ग्रुपवर व्हायरल झाले़