शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भाविकांनी घेतले दर्शन

By admin | Updated: November 28, 2014 01:14 IST

पारनेर : सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावाने चांगभलं असा जयघोष करीत राज्यभरातील भाविकांनी कोरठण येथील खंडोबाचे दर्शन घेतले़

पारनेर : सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावाने चांगभलं असा जयघोष करीत राज्यभरातील भाविकांनी कोरठण येथील खंडोबाचे दर्शन घेतले़राज्यभरातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी लाखो भाविकांची गर्दी झाली़ करवीर पीठाचे शंकराचार्यं, राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्यासह अनेकांनी चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त दर्शनासाठी हजेरी लावली. व भाविकांना आर्शिवचनही दिले.पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त आठवडाभर रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेची बुधवारी समाप्ती झाल्यावर गुरूवारी मुख्य सोहळा झाला़ सकाळी मान्यवरांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते महाआरती झाली. तालुक्यातील गोरेगाव येथून आलेली दिंडी भाविकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली़ नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आले. नेवासे येथील उद्धव महाराज नेवासेकर यांचे कीर्तन झाले. दुपारी एक वाजता खंडोबाच्या चांदीच्या पालखीतून पालखी प्रदक्षिणा झाली़ यावेळी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावाने चांगभलं अशा जयघोषाने परिसर दुमुदुमुन गेला. दुपारी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी भाविकांना आर्शिवचन दिले. सायंकाळी राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांनी खंडोबाचे दर्शन घेतले व भाविकांना आर्शिवचन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नानजीभाई ठककर, देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, तहसिलदार दत्ता भावले, देवस्थानचे विश्वस्त व भोंद्रेचे सरपंच बबन झावरे यांच्यासह विश्वस्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या गर्दीने मंदीर परिसर गजबजला होता़ पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)