शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चिक्की पुरवठादाराला प्रयोगशाळेचा अहवाल अमान्य

By admin | Updated: August 13, 2015 23:12 IST

अहमदनगर : अंगणवाडीतील बालकांना पुरवठा करण्यात आलेली राजगिरा चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल अन्न, औषध विभागाच्या प्रयोगशाळेने दिला होता.

अहमदनगर : अंगणवाडीतील बालकांना पुरवठा करण्यात आलेली राजगिरा चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल अन्न, औषध विभागाच्या प्रयोगशाळेने दिला होता. त्यानुसार नगरच्या अन्न, औषध प्रशासन विभागाने चिक्कीचा पुरवठा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील सूर्यकांता महिला उद्योग संस्थेला नोटीस पाठवून लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. दोन दिवसांपूर्वी पुरवठादार संस्थेने चिक्की नमुन्यांचा अहवाल अमान्य असून त्याची पुनर्तपासणीची मागणी केली आहे. राजगिरा चिक्कीतील कचकच उघड झाल्यानंतर नगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाने २९ जून ला नगर प्रकल्प कार्यालयातून तीन ठिकाणाहून चिक्कीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. तसेच ८४ हजार चिक्कीची पाकिटे जप्त करून ठेवली होती. आजही ही पाकिटे अन्न, औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात आले. अन्न, औषध विभागाच्या प्रयोगशाळेतून चिक्की खाण्यास अयोग असल्याचा अहवाल आल्यानंतर सहाय्यक आयुक्त बी.बी. भोसले यांनी पुरवठादार कंपनीला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत १५ आॅगस्टला संपणार होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुरवठादार सूर्यकांता संस्थेकडून अन्न, औषध विभागाच्या प्रयोगशाळेचा अहवाल अमान्य असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नगरच्या अन्न, औषध विभागाकडे सादर केले असल्याचे भोसले यांनी सांगितले. यामुळे नियमानुसार आता चिक्कीच्या नमुन्यांची केंद्रीय प्रयोगशाळेतून तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)