शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST

अहमदनगर : पेट्रोल-डिझेल-गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दराने किराणा वस्तूसोबत भाजीपालाही महागला आहे. ...

अहमदनगर : पेट्रोल-डिझेल-गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दराने किराणा वस्तूसोबत भाजीपालाही महागला आहे. अनेकांनी आपला मोर्चा कडधान्य, डाळींकडे वळवला आहे. इंधन दरवाढीपाठोपाठ गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने गृहिणींचे किचन बजेट पार कोलमडले आहे. सामान्य माणसांनी जगायचे तरी कसा, असा प्रश्न उभा राहिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. यावर सरकारने अंकुश ठेवण्याची गरज आहे. राज्यात विविध राजकीय पक्षांतर्फे पेट्रोल, डिझेल, तसेच वाढलेल्या गॅसच्या किमती कमी करण्यासाठी आंदोलने, निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत. मात्र, तरीही सरकारने अद्याप त्याची दखल घेतली नसून, गॅसचे दर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ८४८ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे, तरी कसे, असा प्रश्न अनेक गृहिणी विचारत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणींना संसार करताना तारेवरची कसरत होत असून, पैैसा आणायचा कोठून, असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे.

---

ट्रॅक्टरची शेती महागली

जिल्ह्यात बैलाच्या साह्याने मशागतीचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वीप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात बैलजोडी आज दिसत नाही. त्यामुळे अनेक जण ट्रॅक्टरने शेती करतात. मात्र, डिझेलच्या वाढलेल्या दराने ट्रॅक्टर मालकांनी मशागत, नांगरणी, पेरणीचे दरही वाढवले असल्याने ट्रॅक्टरची शेतीही महागली आहे.

-

व्यापारी यांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसापासून महागाई वाढत चालली आहे. प्रत्येक वस्तूही पूर्वीच्या दरात मिळत नाही. यासोबतच सातत्याने पेट्रोल डिझेलचे दरही वाढत असल्याने शेती मशागतीचे दरही वाढले आहेत. सरकारने डिझेलचे दर कमी करुन बळीराजाला दिलासा देण्याची गरज आहे. यामुळे ट्रॅक्टरची शेती महागली आहे.

- शिवाजी पंढरीनाथ गावडे, शेतकरी

-------

बाजारातील सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे आम्हाला मिळणाऱ्या दरापेक्षा दोन पैसे वाढवूनच आम्हाला ग्राहकांना विक्री करावी लागते. भाजीपाला व्यवसायातही कोरोनामुळे अनेक अडचणी वाढल्या आहेत.

- शरद बोबडे, विक्रेते

------------

डाळ स्वस्त, तेल महागले

किराणा वस्तूंमध्ये अनेक वस्तूंचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. सरकारने दहा ते वीस रुपयांनी तेलाचे दर कमी केले असले, तरीही अजूनही तेलाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. ते कमी करण्याची गरज आहे. त्या तुलनेत डाळीचे दर हे कमी आहेत. १२० ते १३० रुपयांवर उडीद, मूगडाळ व अन्य कडधान्य येत असल्याने अनेक जण भाजीपाला खरेदी करण्यापेक्षा डाळ व कडधान्य खरेदी करीत आहेत.

---

कोबी, फ्लावर ६० रुपये किलो

सध्या भाजीपाला बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. भेंडी ७० ते ८० रुपये किलो, टोमॅटो २० ते ३० रुपये किलो, पत्ताकोबी ३० रुपये किलो, फुलकोबी ५० ते ६० रुपये किलो, यासोबतच पालेभाज्याही पंधरा ते वीस रुपयाला एक जुडी विक्री केली जात आहे.

---

घर चालविणे झाले कठीण...

आम्ही ग्रामीण भागातील महिला खूप काटकसर करतो. मात्र, महागाई इतकी वाढली आहे की, घर चालविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सरकारने गोरगरिबांचा विचार करून वाढत्या महागाईवर अंकुश ठेवण्याची गरज आहे. गावातील महिलांसाठी सरकारने शेतीपूरक उद्योग उभारले पाहिजेत.

मीरा बोरुडे, गृहिणी, प्रवरासंगम

---

मी घरकामासोबतच शेतीकामात मदत करते. मात्र, गतवर्षी शेतीतील उत्पन्न झालेच नाही. त्यातच हा कोरोना आणि वाढलेली महागाई यामुळे संसार करताना महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. सरकारने मध्यमवर्गीयांचा विचार करून महागाईवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

छाया सुद्रिक, गृहीण, मुळेवाडी, कर्जत

----------

असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

वर्ष पेट्रोल डिझेल

२०११ ६३.८१ ४१.१६

२०१२ ६८.८६ ४४.३२

२०१३ ७२.५४ ५२.०४

२०१४ ७७.०० ५७.००

२०१५ ६५.०० ५१.००

२०१६ ६५.०० ५१.००

२०१७ ७०.०० ६०.००

२०१८ ७४.०० ६५.००

२०१९ ७६.०० ६६.००

२०२० ८०.०० ६८.००

२०२१ १०५.०० ९५.५०

--------------------

डमी क्रमांक -८८१

नेट फोटोतही सेव केले आहे