शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड नगरपरिषद निवडणूक : भाजपा, सेना, रिपाइंची महायुती

By admin | Updated: December 15, 2015 23:14 IST

जामखेड : जामखेड नगरपरिषदेसाठी भाजपा, शिवसेना व रिपाइं यांची महायुती जिल्हा पातळीवरील झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या चर्चेतून अस्तित्वात आली.

जामखेड : जामखेड नगरपरिषदेसाठी भाजपा, शिवसेना व रिपाइं यांची महायुती जिल्हा पातळीवरील झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या चर्चेतून अस्तित्वात आली. त्यानुसार भाजपाने पहिली सात जणांची यादी जाहीर केली आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेने स्वतंत्र मेळावा व मुलाखती घेऊन स्वबळाची भाषा केली होती. परंतु विधानपरिषद निवडणुकीत जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेची युती झाल्यामुळे जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी युतीबाबत जिल्हा पातळीवर पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भगवान बेरड शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, सेना जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्यात चर्चा होऊन भाजप १४, शिवसेना ६, रिपाइं १ असे जागा वाटप होऊन महायुती जाहीर झाली. जिल्हा पातळीवर झालेल्या युती संदर्भात तालुका पातळीवर भाजपा व शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु तालुका सेनानेते जिल्हाध्यक्ष गाडे यांना भेटण्यास गेल्याने ते आले नाहीत. भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे व युवा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी जिल्हा पातळीवरील चर्चेची माहिती दिली. तालुका सेना नेते नसल्यामुळे थेट शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधण्यात आला. त्यानुसार गाडे यांनी सेनेला सहा, भाजप १४ व रिपाइं १ अशी युती चर्चेअंती ठरली. प्रभागाबाबत निर्णय घेण्यासाठी तालुका सेनेला नगर येथे चर्चेला बोलावले आहे, असे सांगण्यात आले. जिल्हा भाजपाने जाहीर केलेली यादी तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी वाचून दाखवली. यामध्ये प्रभाग एकमधून वर्षा श्रीराम डोके, प्रभाग चार- शिल्पा विक्रांत घायतडक, प्रभाग पाच- वर्षा कैलास माने, प्रभाग आठ- दत्तात्रेय भिमराव ढवळे, प्रभाग तेरा- अमित अरुण चिंतामणी, प्रभाग सोळा - वैशाली ज्ञानेश्वर झेंडे, प्रभाग सतरा- सय्यद हसीना अकबर अशा सात जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. लवकरच उर्वरित यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)