शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या पर्यटन पंढरीत जलोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST

राजूर : कोसळत असलेल्या धो-धो पावसाने नवलाईने नटलेला हिरवागार निसर्ग. तुडुंब भरलेली भात खाचरे. दुथडी भरून वाहणारे ओढे ...

राजूर : कोसळत असलेल्या धो-धो पावसाने नवलाईने नटलेला हिरवागार निसर्ग. तुडुंब भरलेली भात खाचरे. दुथडी भरून वाहणारे ओढे नाले. ओल्याचिंब झालेल्या डोंगररांगा. परिसरातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या गिरी शिखरांवरून उड्या मारत पांढरेशुभ्र धबधबे कोसळू लागल्याने अहमदनगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलोत्सव सुरू झाला आहे.

जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या घाटघर, रतनवाडी, पांजरे या परिसरात यावर्षी पावसाचे लवकर आगमन झाले. रविवारपासून या परिसरावर वरुण राजाची कृपा झाली आणि घाटघर, रतनवाडी, पांजरे येथे धो धो पाऊस कोसळू लागला. अवघ्या आठ-दहा तासांत तब्बल आठ इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. सुरू झालेल्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. डोंगरांच्या टोकांवरून छोटे-मोठे प्रपात जोषात कोसळू लागले आहेत. जोरदार वाऱ्यांमुळे डोंगराच्या शिखराकडे पुन्हा फिरकी घेणारे रिवर्स फॉल लक्ष वेधून घेत आहे. याबरोबरच भरभरून वाहू लागलेल्या ओढ्या नाल्यांमुळे परिसरच जलमय झाला आहे.

भंडारदरा धरणाच्या रिंगरोडला सुरुवात होताच येथील जलोत्सव दृष्टिक्षेपात येण्यास सुरुवात होते. उंच डोंगरावरून वेगवेगळी नावे ठेवलेले धबधबे डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाहीत. धुक्यात हरवलेला घाटघरचा कोकण कडा, कड्या खालून येणारे दाट धुके, त्यापाठोपाठ येणारा सुखद वारा आणि नंतर काही वेळात टपोऱ्या थेंबाने कोसळणारा पाऊस उल्हास निर्माण करीत असतो. एकूण येथील निसर्ग खुलला असून, आता हा जलोत्सवाचा आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

...................

२४ तासांत ८५१ दशलक्ष घनफुटे पाण्याची आवक

मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला. पाणलोटातील घाटघर, रतनवाडी आणि पांजरे येथे आठ इंचाहून अधिक पाऊस पडला, तर भंडारदरा येथेही सुमारे आठ इंच पाऊस पडला. यामुळे चोवीस तासांत भंडारदरा धरणात तब्बल ८५१ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा सकाळी सहा वाजता ६ हजार २३९ दशलक्ष घनफूट इतका झाला होता. कळसुबाई परिसरातून वाहणाऱ्या कृष्णावंती नदीच्या विसर्गात मोठी वाढ झाल्याने वाकी येथील ११२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत असून, या तलावावरून ११२ क्युसेकने पाणी पुढे झेपावत आहे.

..................

गुरुवारच्या चोवीस तासांत भंडारदरा पाणलोट क्षेत्रात नोंदला गेलेला पाऊस. (मिमीमध्ये)

घाटघर २१२

पांजरे २१०

रतनवाडी २०७

भंडारदरा १९०

वाकी१६०मिमी