जैन ओसवाल संस्थेच्या वतीने ७० गरजू कुटुंबांना किराणा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:25 IST2021-08-28T04:25:15+5:302021-08-28T04:25:15+5:30

अहमदनगर : जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्या वतीने ७० गरजू कुटुंबांना महिनाभराचा किराणा देण्यात आला. स्व. सिमरतमलजी गांधी यांच्या १८ ...

Jain Oswal distributes groceries to 70 needy families | जैन ओसवाल संस्थेच्या वतीने ७० गरजू कुटुंबांना किराणा वाटप

जैन ओसवाल संस्थेच्या वतीने ७० गरजू कुटुंबांना किराणा वाटप

अहमदनगर : जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्या वतीने ७० गरजू कुटुंबांना महिनाभराचा किराणा देण्यात आला. स्व. सिमरतमलजी गांधी यांच्या १८ व्या पुण्यस्मरणानिमित्त गांधी परिवाराने केलेली ही मदत बदामबाई गांधी, प्रकाश गांधी, अनिल गांधी, पंकज गांधी, शुभम गांधी यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

जय आनंद मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष नंदलाल कोठारी यांच्या शोभानंद निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मर्चंट्स बँकेच्या संचालिका प्रमिला बोरा, संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, सेक्रेटरी विजय गुगळे, ईश्वर बोरा, नंदलाल कोठारी, सतीश मुथा, रितेश कोठारी, किशोर पितळेे आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी सौरभ बोरा, प्रमिला बोरा, सी. ए. रमेश फिरोदिया, सविता रमेश फिरोदिया, अशोक (बाबूशेठ) बोरा, चंपालाल मुथा, गौतम बोरा, पन्नालाल बोगावत, अजय अतुल बोरा, ॲड. विकी मुथा, अभय श्रीश्रीमाळ, सतीश मुथा, कुणाल विजय गुगळे आदींचे सहकार्य लाभले. (वा.प्र.)

फोटोा : २६ प्रकाश गांधी

Web Title: Jain Oswal distributes groceries to 70 needy families